हा केक अगदी चटपटीत बनून तयार होतो. आता तुम्हाला वाटत असेल असा केले कसा काय असू शकतो. खरं तर हा केक नाहीये तर केकसारखा बनवलेला दही भल्ला आहे, जो खूप चटपटीत आहे. याला केकसारखं सजवून तुम्ही सर्व्ह कराल तेव्हा सगळेच शॉक होतील. ही भन्नाट रेसिपी myflavourfuljourney या इंस्टार्ग्राम चॅनलवर शेअर केली गेली आहे.
advertisement
चटपटीत दही भल्ला केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- 1/2 कप उडीद डाळ
- 1/2 कप मूग डाळ
- बर्फाचे तुकडे
- 3/4 चमचा ENO
- साखर
- मीठ
- पाणी
- थंड गोड दही
चटपटीत दही भल्ला केक बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी तर उडीद डाळ आणि मूग डाळ 5-6 तास भिजत ठेवा.
- डाळी भिजल्यानंतर 2-3 बर्फाचे तुकडे घालून त्याची बारीक पेस्ट बनवा.
- आता हे पीठ 3-4 मिनिटे फेटून घ्या.
- यामध्ये चवीनुसार मीठ आणि चमचा ENO हलून हलक्या हाताने मिक्स करा.
- आता एका बेकिंग टिनमध्ये हे मिश्रण टाकून 20-25 मिनिटे वाफवून घ्या.
- वाफवल्यानंतर 10 मिनिटे त्याला विश्रांती द्या. नंतर या केकचे 2 गोलाकार भाग करा.
- दुसऱ्या बाजूला साखर आणि पाणी मिक्स करून एक द्रावण बनवून घ्या.
- आता केकच्या दोन्ही स्पंजवर हे द्रावण टाका.
- आता घट्ट गोड दही, हिरवी चटणी तिखट आणि लाल आंबट गॉड चटणी घ्या.
- या साहित्याने केक जसा सजवतात, तसेच हे दोन स्पंज सजवा. यासाठी तुम्ही व्हिडीओ पाहू शकता.
अशाप्रकारे तुमचा चटपटीत दही भल्ला केक तयार होतो. हा केक सर्व्ह करताना तुम्ही त्याचे केकप्रमाणेच तुकडे काऊ शकता. त्यासोबत तुम्ही आणखी थंड गोड दही आणि दोन्ही चटण्यांसह सर्व्ह करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
