अशावेळी तुम्ही झटपट बनणारी चटपटीत रताळ्याची भाजी बनवू शकता. ही भाजी टेस्टी तर आहेच पण बटाट्यांपेक्षा आपल्या शरीरासाठी जास्त हेल्दीही आहे. काही साधे मसाले आणि इतर बीभाज्या घालून तयार केलेली ही भाजी घरात सर्वांना नक्की आवडेल. फूड ब्लॉगर कल्पना शर्मा यांनी या भाजीची रेसिपी दिली आहे. इथे पाहा सोपी पद्धत.
advertisement
रताळ्याच्या भाजीसाठी साहित्य..
- चिरलेले अर्धा किलो रताळे
- एक मोठा चमचा तेल
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा हळद
- आल्याचा २-इंचाचा तुकडा
- चार टोमॅटो
- पाऊण चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड
- पाव चमचा काळं मीठ
- चवीनुसार साधं मीठ
- दोन चमचे लिंबाचा रस
अशी बनवा रताळ्याची भाजी..
- सर्वात आधी आलं आणि टोमॅटो बारीक वाटून त्याची मऊसूत पेस्ट बनवा.
- त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला आणि ते तडतडू द्या.
- जिऱ्याचा सुगंध आल्यानंतर त्यात चिरलेल्या रताळ्याचे तुकडे घाला.
- आता यामध्ये हळद घालून रताळे मंद आचेवर सुमारे पाच मिनिटे शिजवा.
- यामुळे रताळे थोडे मऊ होईल आणि मसाले त्यात चांगले मुरतील.
- रताळे अर्धे शिजले की त्यात तयार टोमॅटो आल्याची पेस्ट टाका.
- यात चवीनुसार लाल तिखट, भाजलेली जिरेपूड, काळं मीठ आणि साधं मीठ टाका.
- हे सर्व मसाले रताळ्यासोबत व्यवस्थित मिसळा आणि कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. यामुळे मसाले रताळ्यामध्ये पूर्णपणे मुरतील आणि भाजीला छान सुगंध आणि चव येईल.
- जवळपास 5 ते 7 मिनिटांत तुमची चटपटीत रताळ्याची भाजी व्यवस्तीत शिजेल. शेवटी गॅस बंद करा आणि ताज्या लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करा.
या भाजीमध्ये लिंबाचा रस टाकल्याने त्याच्या आंबटपणाने भाजीची चव आणखी वाढते. ही भाजी तुम्ही चपाती किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता. जास्त तिखट टाकलं नाहीतर ही भाजी मुलंही अगदी आवडीनं खातील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
