भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) टीमने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. तरीसुद्धा काही व्यापारी नवनवीन पद्धती वापरून अन्न पदार्थ बनवतात किंवा भेसळ करतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
भारतातील लोकांना पनीर खूप आवडते. मात्र, बाजारात खऱ्या पनीरऐवजी भेसळयुक्त आणि बनावट पनीर विकले जात आहे, ज्याला सिंथेटिक पनीर म्हटले जाते. हे आरोग्यासाठी खूपच घातक आहे.
advertisement
सिंथेटिक पनीरची किंमत 1किलोसाठी फक्त ₹200 आहे, तर खऱ्या पनीरची किंमत ₹450 ते ₹600 दरम्यान असते. हे पनीर खरे नाही, पण ते दिसायला खऱ्या पनीरसारखे असून चवही जवळपास तशीच वाटते.
2023 मध्ये भारतातील पनीर बाजारपेठ ₹570 अब्ज होती. दरवर्षी 13 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज असून, 2023 पर्यंत ही बाजारपेठ ₹1848 अब्जांपर्यंत पोहोचेल, असे अपेक्षित आहे.
भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी विविध प्रकारचे रसायने वापरली जातात. यात दूध नसते, परंतु पीठ, वनस्पती तेल, स्टार्च इत्यादींचा वापर केला जातो. काही अहवालांनुसार मोठ्या प्रमाणावर पाम तेल किंवा वनस्पती तेल यामध्ये घातले जाते. हे पनीर म्हणून विकले जाते. याचा वापर केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
भेसळयुक्त पनीर खाल्ल्यामुळे अपचन, विषबाधा आणि दीर्घकाळानंतर गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी खऱ्या पनीर आणि बनावट पनीर यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. सरकार आणि अन्न सुरक्षा विभागांनी ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
हे ही वाचा : मालेगाव कथित गैरव्यवहार प्रकरण; नाशिक मर्चंन्ट बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
हे ही वाचा : Wheat Farming : हिवाळ्यात गहू पिकाची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर माहिती