TRENDING:

Health Tips: चिकन, अंडी विसरा; फक्त भाजीमध्ये मिसळा ही गोष्ट, मिळेल भरभरुन प्रोटीन!

Last Updated:

आपल्या शरीरासाठी, प्रथिने खूप महत्त्वाची आहेत. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. प्रथिने ही हाडे, केस, दात आणि नखांसाठी खूप महत्त्वाची आहेत. पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळाली नाहीत तर रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपल्या शरीरासाठी, प्रथिने खूप महत्त्वाची आहेत. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. प्रथिने ही हाडे, केस, दात आणि नखांसाठी खूप महत्त्वाची आहेत. पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळाली नाहीत तर रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. ही पोकळी योग्य वेळी भरून काढण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करून आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो.
जीमध्ये मिसळा ही गोष्ट, मिळेल भरभरुन प्रोटीन!
जीमध्ये मिसळा ही गोष्ट, मिळेल भरभरुन प्रोटीन!
advertisement

सोयाबीनमध्ये अंडी आणि चिकनपेक्षा जास्त प्रथिने असतात. सोयाबीन खाल्ल्याने हेल्दी कार्बोहायड्रेट्स मिळतात जे केवळ एनर्जीच देत नाहीत तर स्नायू तयार करण्यासही मदत करतात. याशिवाय कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियमदेखील सोयाबीनमध्ये असते.

Benefits Of Tulsi Leaves: तुळशीच्या पानांची कमाल; रोज सकाळी खा फक्त 4, मग पाहा चमत्कार!

सोयाबीन खाल्ल्याने आपल्या हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. यामध्ये आइसोफ्लेव्होंस नावाचा गुणधर्म असतो जो खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतो. यामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे फॅटी ॲसिड असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

advertisement

सोयाबीनमध्ये असलेले फायबर तुमच्या पोटासाठीही खूप चांगले आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

सोयाबीनचे फायदे

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होतो

यकृत आणि किडनीसाठी फायदेशीर

वजन कमी करण्यास उपयुक्त

मधुमेहासाठी रामबाण उपाय

रक्तदाब नियंत्रणात राहतो

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

शरीराला दररोज किती प्रोटीनची गरज असते हे त्या व्यक्तीच्या वजनावर अवलंबून असते. एका प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 56 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते, तर प्रौढ महिलेला सुमारे 46 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. याशिवाय गर्भवती किंवा स्तनदा महिलांना दररोज ७१ ग्रॅम प्रथिनांची गरज असते. दररोज सुमारे 100 ग्रॅम सोयाबीनचे सेवन केले जाऊ शकते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips: चिकन, अंडी विसरा; फक्त भाजीमध्ये मिसळा ही गोष्ट, मिळेल भरभरुन प्रोटीन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल