Benefits Of Tulsi Leaves: तुळशीच्या पानांची कमाल; रोज सकाळी खा फक्त 4, मग पाहा चमत्कार!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Tulsi leaves: आपल्या आजीच्या काळापासून तुळशीचा घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो आहे. तुळशीला धार्मिक महत्त्व तर आहेच आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही औषधी गुणधर्मामुळे तुळस महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली : आपल्या आजीच्या काळापासून तुळशीचा घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो आहे. तुळशीला धार्मिक महत्त्व तर आहेच आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही औषधी गुणधर्मामुळे तुळस महत्त्वाची आहे. पानं, देठ, मुळं म्हणजे तुळशीचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. तुळशीचं सेवन केवळ चहामध्ये होतोच पण डिकॉक्शनमध्ये तुळस वापरून सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप या समस्यांपासूनही आराम मिळतो. तसंच रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची चार पानं पाण्यासोबत गिळल्यामुळे अनेक फायदे होतात.
वजन कमी करण्यास मदत -
रोज सकाळी कोमट पाण्यासोबत तुळशीची पानं खाल्ल्यानं चयापचय क्रिया वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दररोज सकाळी सुमारे एक महिना पाण्यासोबत तुळशीची चार पानं खावीत. मात्र, यानंतर तुळस घेणं बंद करावं.
advertisement
प्रतिकारशक्तीत वाढ -
सर्वांनाच सर्दी, खोकला, तापाचा त्रास होतो. पण रोज सकाळी तुळस खाल्ल्यानं तुम्ही या विषाणूजन्य आरोग्य समस्यांपासून सुरक्षित राहता, कारण तुळस तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.
शरीर डिटॉक्स होईल -
रोज सकाळी पाण्यासोबत तुळस खाल्ली तर ते तुमचे शरीर डिटॉक्स करेल आणि आजारांना कारणीभूत असणारे विषारी पदार्थ शरीरातून निघून जातील. वास्तविक, शरीर स्वतःला डिटॉक्स करत असतं पण प्रदूषित वातावरणामुळे शरीरात विषारी पदार्थ वेगानं जमा होतात, ज्यामुळे अवयवांवर अतिरिक्त ताण येतो.
advertisement
पचनशक्ती सुधारणा -
रोज सकाळी तुळशीची पानं खाल्ल्यानं तुमची पचनशक्ती हळूहळू सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ बद्धकोष्ठता, गॅस, अपचन हळूहळू कमी होण्यास मदत होते.
तुळशीची फक्त चार पानं तुमचं आरोग्य सुधारू शकतात. पण एकावेळी तीस ते चाळीस दिवस सतत आणि दीर्घकाळ ही पानं खाऊ नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 31, 2024 10:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits Of Tulsi Leaves: तुळशीच्या पानांची कमाल; रोज सकाळी खा फक्त 4, मग पाहा चमत्कार!






