पहिली पद्धत - गरम पाणी
लसूण सोलण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे गरम पाण्याचा वापर. यासाठी सर्वात आधी लसणाच्या पाकळ्या हाताने दाबून वेगळ्या करून घ्या. आता एका भांड्यात थोडं गरम पाणी घ्या आणि लसणाच्या पाकळ्या त्यात 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवा. गरम पाण्याच्या संपर्कात आल्यावर लसणावरील पातळ साली मऊ पडतात आणि सैल होतात. त्यानंतर बोटांनी हलकासा दाब दिल्यावर साल आपोआप निघून येते. ही पद्धत जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असेल तर अत्यंत उपयुक्त ठरते.
advertisement
दुसरी पद्धत - दाब वापरा
सर्वात आधी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करा आणि त्या झाकण असलेल्या मोठ्या डब्यात ठेवा. यामध्ये तुम्ही ब्लेडही टाकू शकता. आता तो डबा 30-40 सेकंद जोरात हलवा. जेव्हा पाकळ्या एकमेकांवर आणि डब्याच्या भिंतींवर आदळतात, तेव्हा त्यांची साल आपोआप सैल होऊन वेगळी होते. काही सेकंदांनी झाकण उघडून पाहा. बहुतेक पाकळ्या सोललेल्या दिसतील. ही पद्धत वेळही वाचवते आणि मेहनतही कमी लागते.
तिसरी पद्धत - मायक्रोवेव्ह किंवा तवा
जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर लसूण सोलणं आणखी सोपं होऊ शकतं. लसणाच्या पाकळ्या 15-20 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. त्यामुळे साल सुकून सैल होते आणि हलकं ओढलं की, सहज निघून येते. मायक्रोवेव्ह नसेल तर कोरड्या तव्यावर मंद आचेवर 20-30 सेकंद लसूण गरम करू शकता. मात्र लक्षात ठेवा, लसूण जास्त शिजू देऊ नका. फक्त हलकी उष्णता पुरेशी असते.
या सोप्या ट्रिक्सचा अवलंब केल्यास तुम्ही दोन मिनिटांत मोठ्या प्रमाणात लसूण सोलू शकता. या पद्धतींमुळे ना जास्त मेहनत लागेल, ना जास्त वेळ खर्च करावा लागेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
