गुळवेलीच्या पानांचा रस पिण्याचे आरोग्यगदायी फायदे
उच्च रक्तदाबावर गुणकारी
गुळवेलीच्या पानांचा रस प्यायल्यामुळे रक्तदाब कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलीच्या पानं खावीत किंवा पानांचा रस प्यावा.
डायबिटीसवर गुणकारी
गुळवेलीचा रस प्यायल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहाते.त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलीचं सेवन करावं.
advertisement
त्वचेसाठी फायदेशीर
गुळवेलीचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकायला मदत होते. त्यामुळे संभाव्य त्वचाविकारांचा धोका टाळता येतो. गुळवेलीचं खोड उगाळून ते शरीरावर लावल्याने त्वचेचं संरक्षण होतं.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
गुळवेलीचा रस प्यायल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामुळे हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण करता येतं. जर तुम्हाला सतत भरपूर ताप, सर्दी किंवा खोकल्चा त्रास होत असेल तर गुळवेलचा रस तुमच्यासाठी या आजारांवर गुणकारी ठरू शकतो.
पचन सुधारतं
गुळवेलचा रस प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या आजारांवर गुळवेलीचा रस गुणकारी ठरतो.
गुळवेलीचे फायदे जाणून घेतल्यानंतर पाहुयात कोणत्या व्यक्तींसाठी गुळवेल धोक्याची ठरू शकते.
- घरातली लहान मुलं सतत आजारी पडत असतील तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना गुळवेलीचा रस देऊ नये. याशिवाय गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळवेलीचा रस पिऊ नये. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- गुळवेलीचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गुळवेलीपासून चार हात दूर रहावं.
- यकृताच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी गुळवेलीचा रस पिणं धोक्याचं ठरू शकतं.