TRENDING:

Hair Care : केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोजमेरी, कांद्याचं तेल वापरुन पाहा, केस होतील मजबूत

Last Updated:

केस गळणं, केस विरळ होणं आणि केसांची वाढ खुंटणं या समस्या अनेकांना जाणवतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि आहार यांचे परिणाम सर्वप्रथम केसांवर दिसतात. यावर अनेकजण नैसर्गिक उपाय वापरताना दिसताय. विशेषतः रोझमेरी तेल आणि कांद्याचं तेल सध्या ट्रेंडमधे आहे. सोशल मीडियावरही यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. केसांच्या वाढीसाठी कोणतं तेल सर्वोत्तम आहे, त्याचे फायदे काय आहेत समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केस पातळ होणं, केस गळणं, या समस्या तुमच्याही असतील तर इथे दिलेल्या उपायाचा तुम्हाला वापर करुन पाहता येईल.
News18
News18
advertisement

केस गळणं, केस विरळ होणं आणि केसांची वाढ खुंटणं या समस्या अनेकांना जाणवतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि आहार यांचे परिणाम सर्वप्रथम केसांवर दिसतात. यावर अनेकजण नैसर्गिक उपाय वापरताना दिसताय. विशेषतः रोझमेरी तेल आणि कांद्याचं तेल सध्या ट्रेंडमधे आहे. सोशल मीडियावरही यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. केसांच्या वाढीसाठी कोणतं तेल सर्वोत्तम आहे, त्याचे फायदे काय आहेत समजून घेऊया.

advertisement

Health Tips : चिया सीड्ससोबत लिंबू पाणी पिऊन करा दिवसाची सुरुवात, आरोग्याच्या अनेक तक्रारींवर गुणकारी

रोझमेरी तेल हे एक हर्बल इसेन्शियल ऑइल आहे, यामुळे टाळूतील रक्ताभिसरण वाढतं. यामुळे केसांच्या मुळांना उत्तम पोषण मिळतं आणि केसांची वाढ सुधारू शकते. ज्यांना केस गळणं आणि केस पातळ होण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे तेल फायदेशीर मानलं जातं.

advertisement

कांद्याच्या तेलात सल्फर भरपूर प्रमाणात असतं, यामुळे केसांची मुळं मजबूत करण्यास मदत होते. यामुळे टाळूचं पोषण होतं आणि खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत करू शकते. केस तुटणं, कोंडा किंवा कमकुवत केसांची समस्या असेल, तर हे तेल खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र, त्याचा वास थोडा तीव्र असतो, जो काहींना कदाचित आवडणार नाही.

advertisement

केसांची वाढ आणि टाळूसाठी रोझमेरी तेल एक चांगला पर्याय असू शकतो. पण, केस कमकुवत असतील आणि सहज तुटत असतील, तर कांद्याचं तेल अधिक परिणामकारक ठरू शकतं.

Skin Care : चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी नैसर्गिक उपाय, चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी जाणून घ्या नारळ तेल - दह्याचा वापर कसा करायचा ?

advertisement

रोझमेरी तेल नेहमी खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलामधे मिसळून पातळ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर करणं उपयुक्त ठरेल. रोझमेरी तेलानं टाळूवर हळुवारपणे मालिश करा आणि एक ते दोन तासांनंतर धुवा. याच्या परिणामांसाठी नियमित वापर आवश्यक आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

कोणतंही तेल वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा. टाळू संवेदनशील असेल किंवा ॲलर्जी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. दोन्ही तेलांचे फायदे आहेत. केसांच्या गरजेवर योग्य निवड अवलंबून असते. नियमित काळजी आणि योग्य तेल वापरामुळे केसांचा पोत सुधारू शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोजमेरी, कांद्याचं तेल वापरुन पाहा, केस होतील मजबूत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल