TRENDING:

Declutter : नवीन वर्षात नवी सुरुवात, टाकाऊ वस्तूंना करा बायबाय, घर ठेवा स्वच्छ आणि सकारात्मक

Last Updated:

आजारपण आलं तर आधी अन्न, प्रदूषण किंवा ताण अशा बाह्य घटकांचा विचार आधी मनात येतो. पण अनेकदा, आजारपणाचं कारण घरातच असतं. तुम्हालाही नवीन वर्षात आणि पुढेही तंदुरुस्त आणि निरोगी राहायचं असेल तर आजच तुमच्या घरातून या पाच गोष्टी काढून टाका.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! नवीन वर्षात अनेकजण संकल्प करतात. वाईट आठवणींना विसरुन पुढे जाण्याचा प्रयत्न असतो. तसाच एक संकल्प म्हणजे तब्येतीचा.
News18
News18
advertisement

आजारपण आलं तर आधी अन्न, प्रदूषण किंवा ताण अशा बाह्य घटकांचा विचार आधी मनात येतो. पण अनेकदा, आजारपणाचं कारण घरातच असतं. तुम्हालाही नवीन वर्षात आणि पुढेही तंदुरुस्त आणि निरोगी राहायचं असेल तर आजच तुमच्या घरातून या पाच गोष्टी काढून टाका.

कालबाह्य झालेले पदार्थ आणि जंक फूड - बऱ्याच घरांमधे पॅकेज स्नॅक्स, बिस्किटं, चिप्स किंवा इन्स्टंट नूडल्स असतात, ज्यांची कालबाह्यता तारीख उलटून गेली आहे किंवा त्यात कोणतंही पौष्टिक मूल्य उरलेलं नसतं. या पदार्थांमुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. हे पदार्थ खाणं टाळा आणि ताजी फळं, भाज्या, सुकामेवा आणि घरी शिजवलेलं अन्न खाण्याला प्राधान्य द्या.

advertisement

Uric Acid : युरिक अ‍ॅसिड वाढू नये म्हणून हे उपाय करुन पाहा, हे पदार्थ खाऊ नका

बऱ्याचदा वर्षानुवर्षं प्लास्टिकच्या त्याच बाटल्या किंवा कंटेनर वापरतात. यातली रसायनं कालांतरानं अन्न आणि पेयांमधे मिसळू शकतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

प्लास्टिकमधे गरम अन्न किंवा पाणी साठवणं विशेषतः हानिकारक आहे. म्हणून, स्टील, काच किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करा.

advertisement

जुनी वर्तमानपत्रं, तुटलेल्या वस्तू, टाकाऊ कपडे आणि कचरा यामुळे जागा व्यापली जाते तसंच यामुळे धूळ साठत जाते आणि या वस्तू ठेवलेली ठिकाणी जंतूंचं प्रजनन केंद्र देखील बनतात. यामुळे ऍलर्जी, दमा आणि संसर्गाचा धोका वाढतो.

आठवड्यातून किमान एकदा तरी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि ज्या वस्तूंची तुम्हाला गरज नाही त्या दान करा किंवा टाकून द्या.

advertisement

Heart Disease : हृदयविकाराचे शरीर देतं संकेत, या लक्षणांबद्दल गल्लत करु नका

साखर आणि मीठाचं अतिसेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब होतो.

घरात साखरयुक्त पेयं, मिठाई आणि स्नॅक्स भरलेले असतील तर त्यामुळे हे पदार्थ जास्त खाण्याची इच्छा होऊ शकते. हे प्रमाण मर्यादित करा आणि गूळ, मध आणि सैंधव मीठ यासारखे आरोग्यदायी पर्याय निवडा.

advertisement

मानसिक आरोग्य हे अन्न आणि पेयाइतकंच महत्त्वाचं आहे. नकारात्मक विचार, अनावश्यक ताण, भूतकाळातील संघर्षांच्या आठवणी किंवा सतत नकारात्मक बातम्या या सर्व गोष्टी मानसिक आजाराला कारणीभूत ठरू शकतात.

घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा, चांगली पुस्तकं वाचा, संगीत ऐका आणि प्रियजनांसोबत वेळ घालवा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डोकं टोकदार, शरीर सपाट; सोलापुरात आला अनोखा सरडा, पाहण्यासाठी एकच गर्दी
सर्व पहा

नवीन वर्षाच्या तुम्हाला आरोग्यदायी शुभेच्छा !

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Declutter : नवीन वर्षात नवी सुरुवात, टाकाऊ वस्तूंना करा बायबाय, घर ठेवा स्वच्छ आणि सकारात्मक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल