TRENDING:

Health Tips : जास्त खाल चिप्स-कुरकुरे तर लिव्हर, हार्ट होईल खराब! तज्ज्ञांनी वर्तवला या गंभीर आजाराचा धोका

Last Updated:

केवळ तरुण किंवा मोठ्या व्यक्तींनाच नाही तर लहान मुलांनाही जंक फूड प्रचंड आवडते. त्यामुळे अगदी रोज चिप्स, कुकीज किंवा कॉर्न फ्लेक्स, कोल्ड ड्रिंक, फ्रोझन फूड खाल्ले जाते. या सर्व गोष्टी अल्ट्रा प्रोसेस्ड आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हल्ली लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीनमध्ये कळूप बदल झाला आहे. पौष्टिक अन्नापेक्षा जंक फूड खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. केवळ तरुण किंवा मोठ्या व्यक्तींनाच नाही तर लहान मुलांनाही जंक फूड प्रचंड आवडते. त्यामुळे अगदी रोज चिप्स, कुकीज किंवा कॉर्न फ्लेक्स, कोल्ड ड्रिंक, फ्रोझन फूड खाल्ले जाते. या सर्व गोष्टी अल्ट्रा प्रोसेस्ड आहेत. म्हणजेच हे पदार्थ बनवण्यासाठी त्यातील कच्च्या मालावर तीन-चार वेळा रासायनिक प्रक्रिया केली जाते.
News18
News18
advertisement

या रासायनिक प्रक्रियेमुळे कच्च्या मालाचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होऊन त्यात अनेक हानिकारक रसायनांचा समावेश होतो. याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणतात. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड बनवण्याच्या प्रक्रियेत तो पदार्थ तीन लेव्हलमधून जातो. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे शरीरातील रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार, पचनाच्या समस्या इत्यादींमध्ये वाढ होत असल्याचा दावा अनेक संशोधनांमध्ये केला जात आहे.

न्यूज 18 ने या विषयावर बेंगळुरू येथील अपोलो हॉस्पिटलमधील पोषण आणि आहारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख आणि मुख्य क्लिनिकल आहारतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांच्याशी चर्चा केली. यावर त्या म्हणाल्या, चिप्स आणि कुरकुरे यासारख्या अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे लिव्हर हळूहळू खराब होऊ शकते. परंतु आतड्याचे अस्तर थेट मेंदूशी संबंधित आहे आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड थेट मेंदूला हानी पोहोचवत असल्याचे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे.

advertisement

लिव्हर खराब होण्याची लक्षणे आणि कारणे..

डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सांगितले की, अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे हळूहळू लिव्हर खराब होऊ शकते. खरं तर, अशी अनेक हानिकारक रसायने पॅकेज केलेल्या वस्तूंमध्ये आढळतात, ज्याबद्दल कंपनी योग्यरित्या खुलासा करत नाही. यामध्ये कृत्रिम रंग आणि फूड रेग्युलेटर टाकले जातात. यासोबतच -2, E-21 किंवा E-26 सारखे शब्द पाकिटावर रंग म्हणून लिहिलेले असते. ही हानिकारक रसायने आहेत, हे सामन्यांना कळत नाही.

advertisement

त्याचप्रमाणे INS 330 हे ऍसिड रेग्युलेटर असे लिहिले आहे. हे सायट्रिक ऍसिड म्हणून देखील लिहिलेले असते. परंतु ते नैसर्गिक सायट्रिक ऍसिडपेक्षा खूप वेगळे आहे. डॉ. प्रियंका यांनी सांगितले की, ही ऍडेड संयुगे लिव्हरला सर्वात जास्त नुकसान करतात. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होऊ शकतो. पोटात गेल्यावर ते चांगले बॅक्टेरिया मारून टाकते, ज्यामुळे आतड्याचे अस्तर खराब होऊ लागते. हे अस्तर मेंदूला सिग्नल देते. लिव्हर व्यतिरिक्त या गोष्टींचा परिणाम किडनीवरही होतो. म्हणजे पॅकेज्ड प्रोसेस्ड फूड लिव्हर आणि किडनीला इजा करू लागते.

advertisement

मीठ सर्वात जास्त धोकादायक..

पॅकेज केलेल्या चिप्स आणि क्रिस्पमध्ये भरपूर मीठ असते. हे ते पदार्थ खातानाच कळते. वास्तविक जेव्हा केक, पेस्ट्री, चॉकलेट्स, सुकामेवा, बेरी इत्यादी बनवले जातात तेव्हा ते जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी सोडियम टाकले जाते. जर तुम्ही चॉकलेट खाता ते गोड चवीचे असते. मात्र, याचा अर्थ असा नाही की चॉकलेट फक्त गोड आहे, त्यात भरपूर प्रमाणात मीठदेखील असते. पॅकेज्ड ड्रायफ्रुट्स, फास्ट फूड, सिंथेटिक फूडमध्येही असेच असते. जास्त मिठामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सोडियम जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढते. हे हृदयाला सर्वात जास्त नुकसान करते. याचा परिणाम हृदयाच्या स्नायूंवर होऊ शकतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन अजिबात न करणे किंवा कमीत कमी करणे आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : जास्त खाल चिप्स-कुरकुरे तर लिव्हर, हार्ट होईल खराब! तज्ज्ञांनी वर्तवला या गंभीर आजाराचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल