ज्याप्रमाणे खाण्याच्या वाईट सवयींमुळे आतड्यांमधे घाण साचू शकते, त्याचप्रमाणे काही पदार्थ खाल्ल्यानं आतड्यांच्या हालचालींना नैसर्गिकरित्या चालना मिळू शकते. यासाठी दैनंदिन आहारात तीन गोष्टींचा समावेश करू शकता.
कडुनिंब आणि हळद - दिवसाची सुरुवात कडुनिंब आणि हळद खाऊन करण्याचा सल्ला जग्गी वासुदेव यांनी दिला आहे. यासाठी, कडुनिंबाची काही पानं बारीक करा, त्यात थोडी हळद घाला आणि त्यांचे लहान गोळे करा. सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंब आणि हळदीचं हे मिश्रण खाणं खूप फायदेशीर आहे.
advertisement
Carrots : गाजरांमुळे दृष्टी सुधारते का ? गाजर किती प्रमाणात खावं ?
कडुनिंब शरीरातील हानिकारक जीवाणू नष्ट करते आणि पचनसंस्था स्वच्छ करते. हळदीसोबत खाल्ल्यानं त्याचा परिणाम वाढतो. यामुळे शरीर स्वच्छ होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
त्रिफळा सेवन - त्रिफळा हे आवळा, हरद आणि बहेडा तीन फळांचं मिश्रण आहे. यामुळे शरीराला आतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. सद्गुरूंच्या मते, झोपण्यापूर्वी त्रिफळा पावडर पाणी, दूध किंवा मधासह घ्यावी. यामुळे सकाळी पोट साफ होतं आणि आतडी नैसर्गिकरित्या निरोगी राहतात.
Hair Care : केसांसाठी घरीच बनवा तेल, सात दिवसांत केस तुटण्याची समस्या होईल कमी
एरंडेल तेल - या व्यतिरिक्त, एरंडेल तेलही प्रकृतीसाठी उत्तम आहे. अर्धा चमचा कोमट एरंडेल तेल पाण्यात किंवा दुधात मिसळून रात्री प्यायल्यानं शरीरातील साचलेली अशुद्धी हळूहळू काढून टाकण्यास मदत होते. यामुळे आतडी स्वच्छ होण्यास मदत होते आणि शरीर हलकं वाटतं.
जेवणांमध्ये पाच ते सहा तासांचं अंतर ठेवा, जेणेकरून शरीराला पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. या सोप्या उपायांमुळे आतडी स्वच्छ राहतीलच, शिवाय तुम्हाला अधिक सक्रिय आणि निरोगी वाटेल.
