TRENDING:

Health Tips : घामाचा वास सांगतो प्रकृतीचे अपडेट, घाम येण्याच्या पद्धतीवरुन कळेल शरीरातली घडामोड, जाणून घ्या सविस्तर माहिती

Last Updated:

घामामुळे त्वचा स्वच्छ राहते, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवलं जातंच. तसंच हा घाम आजार किंवा संसर्गाचंही लक्षण असू शकतो. शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केलं त्यात अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. घामाच्या वासामधे विशेषतः महिलांच्या बाबतीत, आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत दडलेले असू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या उन्हाळा सुरु आहे, आता जास्त आणि एरवीही घाम तर येतोच. घाम येणं ही आपल्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवायला मदत होते.
News18
News18
advertisement

घामामुळे त्वचा स्वच्छ राहते, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवलं जातंच. तसंच हा घाम आजार किंवा संसर्गाचंही लक्षण असू शकतो. शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केलं त्यात अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. घामाच्या वासामधे विशेषतः महिलांच्या बाबतीत, आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत दडलेले असू शकतात.

हा दुर्गंध शरीरातील अंतर्गत समस्यांचं लक्षण असू शकतो, ज्यात हार्मोनल बदल, त्वचेचा संसर्ग किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे संक्रमण म्हणजेच - एसटीआय यांचा समावेश असू शकतो.

advertisement

Hair Care : तेल कोमट करुन केसांंना का लावतात ? जाणून घ्या या पद्धतीचं महत्त्व आणि कारण

संसर्ग - शरीराच्या घामाची त्वचेवरील जिवाणू किंवा बुरशीसोबत रासायनिक अभिक्रिया होते, तेव्हा तीव्र दुर्गंधी येते. ही दुर्गंधी नेहमीपेक्षा जास्त तीव्र असेल आणि दीर्घकाळ टिकून राहिली, तर ते त्वचेच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं.

advertisement

लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग - एका अभ्यासानुसार, गोनोरियासारख्या काही लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गांमुळे शरीराच्या वासात बदल होऊ शकतो. या अभ्यासातील महिला संक्रमित पुरुषांच्या घामाचा वास इतर संक्रमित व्यक्तींच्या घामाच्या वासापासून वेगळा ओळखू शकल्या. ही पद्धत पूर्णपणे अचूक नसली तरी, ती एक चांगला निर्देशक ठरू शकते.

हार्मोनल असंतुलन - महिलांमधे दर महिन्याला मासिक पाळीत होणारे हार्मोनल बदल, थायरॉईडचा घामाच्या वासावर देखील परिणाम होऊ शकतो. हायपरथायरॉईडीझम असलेल्या महिलांना जास्त घाम येतो आणि त्याचा वास अधिक तीव्र असू शकतो.

advertisement

मधुमेह - घामाला गोड किंवा फळांसारखा वास येत असेल, तर ते रक्तातील साखरेच्या असंतुलनाचं लक्षण असू शकतं. याला 'कीटोन ब्रेथ' म्हणतात, शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हे होतं.

यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या - घामाला अमोनिया किंवा लघवीसारखा तीव्र वास येत असेल, तर ते यकृत किंवा मूत्रपिंडाच्या बिघाडाचं लक्षण असू शकतं. शरीर विषारी पदार्थ योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते घामाद्वारे बाहेर पडतात.

advertisement

Summer Care : उन्हाळ्यात राहा ठंडा ठंडा कुल कुल, जाणून घ्या कोरफडीच्या रसाची आरोग्यकारक उपयुक्तता

प्रकृतीची काळजी घेण्यासाठी या टिप्सचा वापर करता येईल.

नियमितपणे स्नान करा आणि चांगली स्वच्छता राखा.

संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

डिओडोरंट लावून दुर्गंध लपवण्याऐवजी, त्याचं कारण शोधा.

घामाचा वास वेगळा वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

घामाच्या वासाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. हा शरीराकडून मिळणारा एक संकेत आहे, आणि तो समजून घेणं आणि त्यावर वेळेवर उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : घामाचा वास सांगतो प्रकृतीचे अपडेट, घाम येण्याच्या पद्धतीवरुन कळेल शरीरातली घडामोड, जाणून घ्या सविस्तर माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल