खराब कोलेस्ट्रॉल करते कमी
आम्ही तुम्हाला सांगतो की, जवसमध्ये लिग्नॅन्स, फायबर, प्रोटीन आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिड जसे की अल्फा-लिनोलेनिक ऍसिड किंवा ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असतात. जवस चांगल्या चरबी, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असते. ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते आणि हृदय निरोगी ठेवते. तसेच रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करते.
advertisement
कसं खाऊ शकता?
याला सुपरफूड देखील म्हणतात, कारण त्यात इतर पदार्थांपेक्षा अनेक पटीने जास्त लिग्नॅन्स असतात. या बियांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी जवस तेलाचा वापर करा. हे बी भिजवून किंवा बारीक करून खाल्ल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. तुम्ही ते नाश्त्यात तृणधान्यासोबत किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता.
जवस पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. जवसमध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यात विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. विरघळणारे फायबर मल मऊ करते आणि आतड्यांमधून विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकण्यास मदत करते.
डायबेटिस नियंत्रणात ठेवते
जवस ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. खरं तर जवसमध्ये अक्रोडपेक्षा जास्त ओमेगा-3 असते. 100 ग्रॅम जवसमध्ये सुमारे 22.81 ग्रॅम ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, तर 100 ग्रॅम अक्रोडमध्ये सुमारे 9.08 ग्रॅम ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते. जवस मधुमेह नियंत्रित करते. जवस इन्सुलिनच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते हृदय निरोगी ठेवते. या बिया amino acids, arginine आणि glutamine ने भरपूर असतात. ही दोन्ही तत्वे हृदय निरोगी ठेवतात.
हे ही वाचा : 'या' झाडांकडे आकर्षित होतात साप; वेळीच व्हा सावध! निष्काळजीपणा बेतू शकतो जीवावर...
हे ही वाचा : कडू आहे, पण दातांसाठी ठरतं वरदान! प्लाक करेल साफ अन् दुर्गंधी होते दूर; हिरडेदेखील राहतील मजबूत