अल्मोडा : कर्करोग म्हणजेच कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. 2020 मध्ये 1 कोटीहून अधिक जणांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. यामध्ये सर्वाधिक स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर यामुळे लोकांचे मृत्यू झाले. या कर्करोगाच्या पेशींचा उशीरा शोध घेतल्याने उपचारात विलंब होतो आणि परिणामी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
यापैकी एक म्हणजे ब्रेन कॅन्सर अर्थात मेंदूचा कर्करोग. हा मानवासाठी धोकादायक आजार आहे. म्हणून, सुरुवातीच्या टप्प्यातच या आजाराचा शोध घेणे खूपच महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर लोकल18 च्या टीमने कर्करोग विशेषज्ञ राहुल सिंग यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ब्रेन कॅन्सरची लक्षणे आणि उपचार यावर महत्त्वाची माहिती दिली.
ब्रेन कॅन्सरची लक्षणे आणि उपाय -
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ब्रेन कॅन्सरची लक्षणे अनेक प्रकारची आहेत. मात्र, सर्वात सामान्य लक्षणांमध्ये एक म्हणजे डोकेदुखी आहे. ही डोकेदुखी सकाळच्या सुमारास अधिक जाणवते. तर इतर लक्षणांमध्ये उलट्या होणे, दृष्टी कमी होणे, चालणे आणि बोलण्यात त्रास होणे आणि शरीराचा अर्धा भाग सुन्न होणे यांचा समावेश होतो. ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे महत्त्वाचे आवाहन त्यांनी केले.
या लोकांमध्येही दिसतो ब्रेस्ट कॅन्सर -
ब्रेन कॅन्सर हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. तसेच अनेकदा फुफ्फुसाच्या कॅन्सर पीडित रुग्णांमध्ये ब्रेन कॅन्सरची लक्षणेही विकसित होऊ शकतात. मात्र, याचा उपचार शक्य आहे. तसेच हा प्रामुख्याने ट्यूमरच्या आकारावर आणि स्थानावर अवलंबून असतो. यातील ट्यूमर ऑपरेशनद्वारे काढून टाकणे चांगले आहे, अन्यथा रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि इतर वैद्यकीय उपायांची मदत घेतली जाऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांशी एकदा अवश्य चर्चा करा.
