थायरॉईड नियंत्रणासाठी कोथिंबीर उपयुक्त : कोथिंबिरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक खनिजे असतात, जे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत ठेवतात. ही हायपोथायरॉईडिझम आणि हायपरथायरॉईडिझम या दोन्ही समस्यांसाठी फायदेशीर आहे आणि शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
वजन नियंत्रणास मदत : डॉ. नेहा गोयल यांच्या मते, थायरॉईडमुळे मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, ज्यामुळे अचानक वजन वाढू किंवा कमी होऊ शकते. कोथिंबीर पचनसंस्था सुधारून मेटाबॉलिझम वाढवते आणि शरीराचे वजन संतुलित ठेवण्यास मदत करते.
advertisement
हार्मोन्सचे संतुलन राखते : थायरॉईडमुळे हार्मोन्स असंतुलित होतात, त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, मूड स्विंग्स आणि तणाव यांसारख्या समस्या होऊ शकतात. कोथिंबिरीतील पोषकतत्त्वे हार्मोन्सचे संतुलन राखतात आणि या समस्या कमी करतात.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते : कोथिंबीर नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. हे रक्त शुद्ध करते आणि थायरॉईडशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. कोथिंबीरचे डिटॉक्स वॉटर शरीर शुद्ध करून मेटाबॉलिझम सुधारते.
थकवा आणि अशक्तपणा कमी करते : थायरॉईडच्या रुग्णांना अनेकदा थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कोथिंबिरीतील पोषकतत्त्वे शरीराला ऊर्जा देतात आणि अशक्तपणा दूर करून अधिक सक्रिय आणि ऊर्जावान वाटण्यास मदत करतात.
केस गळती कमी करते : थायरॉईडमुळे केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे. नियमितपणे कोथिंबीर सेवन केल्याने शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते आणि केस मजबूत होतात. कोथिंबीर पाणी प्यायल्याने केस गळती कमी होते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : कोथिंबीरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. हे फक्त थायरॉईडच नव्हे, तर इतर आजारांपासूनही शरीराचे संरक्षण करते आणि एकूण आरोग्य सुधारते.
कोथिंबीर वापरताना घ्यायची काळजी : कोथिंबीर सहसा सुरक्षित मानली जाते, पण शरीराचा उष्णता स्वभाव जास्त असणाऱ्या लोकांनी ती जास्त प्रमाणात घेऊ नये. नाकातून रक्त येणे, जास्त घाम येणे किंवा उष्णतेशी संबंधित इतर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोथिंबीरचे कसे सेवन करावी?
- कोथिंबीरचे पाणी : एक चमचा कोथिंबीर वाटून कोमट पाण्यात मिसळून दररोज सकाळी प्यावे.
- धण्याचे पाणी: रात्री धणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून प्या.
- आहारात समावेश : सूप, कोशिंबिरी आणि भाज्यांमध्ये कोथिंबीर टाकून सेवन करा.
थायरॉईडच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोथिंबीरचा समतोल आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरू शकतो.
हे ही वाचा : मासिक पाळीमध्ये होतोय प्रचंड त्रास? तर 'या' पिवळ्या दाण्यांचा करा खास उपाय, झटक्यात मिळतो आराम
हे ही वाचा : Health Tips : 'चहा अन् गरम पाणी सोडा, या' 5 भाज्याच करतील तुमची बद्धकोष्ठतेपासून सुटका!