महिलांचं शरीर, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित गरजांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य आहार त्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्य देखील यामुळे सुधारतं.
Weight Loss : बारीक होण्यासाठीच्या सहा टिप्स, सात दिवसात दिसेल फरक
अक्रोड आणि जवस
अक्रोड आणि जवसात, ओमेगा- 3 फॅटी ॲसिड आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. हृदयाचं आरोग्य, केस आणि त्वचेचं पोषण आणि संप्रेरकाचं संतुलन राखण्यासाठी याची मदत होते. विशेषत: रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांसाठी संप्रेरकांचं संतुलन खूप महत्वाचं आहे.
advertisement
पालेभाज्या
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. ॲनिमियापासून संरक्षण करण्यासोबतच हाडांच्या मजबुतीसाठी पालेभाज्या आवश्यक आहेत. महिलांना अनेकदा लोहाच्या कमतरतेचा त्रास होतो, त्यामुळे पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
दही
दही हा प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं. दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. दही खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
Cholesterol: पायांवरची सूज असू शकेल कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण, धोका ओळखा, तातडीनं उपाय करा
बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी याचा उपयोग होतो.
मसूर डाळ
मसूर डाळ ही प्रथिनं आणि फॉलिक अॅसिडचा चांगला स्रोत आहे. स्नायूंची बळकटी, त्वचेवरची चमक आणि गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकासासाठी ही डाळ उपयुक्त आहे.
