तुम्ही जास्त गरम पाणी प्यायल्यास, त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. गरम पाणी पोटातील श्लेष्मल त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं, ज्यामुळे ॲसिडिटी, अपचन आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. किडनीचं मुख्य कार्य शरीरातील अतिरिक्त पाणी फिल्टर करून लघवी तयार करणं आहे. पण तुम्ही जास्त पाणी, विशेषतः गरम पाणी प्यायल्यास, ते किडनीवर अनावश्यक दबाव टाकू शकतं, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
रक्तदाब कमी जास्त होणे
जास्त गरम पाणी प्यायल्यामुळे रक्तदाबाचं संतुलन बिघडू शकतं. ते शरीरातील सोडियम आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीवर परिणाम करू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि थकवा येऊ शकतो. पाणी खूप गरम असल्यास, ते घसा आणि तोंडाच्या नाजूक त्वचेला भाजून काढू शकतं. यामुळे फोड, घसा सूजणे आणि वेदना यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त गरम पाणी दीर्घकाळ प्यायल्याने घशातील पेशींवर वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात.
वारंवार घाम येणे आणि डिहायड्रेशन
अत्यंत गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान वाढतं, ज्यामुळे जास्त घाम येतो. शरीराला जास्त घाम आल्यास, डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. तुम्हाला पोटात जळजळ आणि ॲसिडिटी, घसा सूजणे किंवा वेदना, जास्त घाम येणे आणि वारंवार लघवी होणे, अशक्तपणा आणि थकवा, डोकेदुखी आणि रक्तदाबात चढ-उतार यांसारखी लक्षणं जाणवल्यास, गरम पाण्याचे सेवन कमी करा.
मग किती गरम पाणी पिणं योग्य आहे?
- कोमट पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- विशेषतः रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी खूप गरम पाणी पिणं टाळा.
- दिवसभरात जास्तीत जास्त 8-10 ग्लास पाणी प्या, पण जास्त गरम पाणी पिणं टाळा.
हे ही वाचा : 6 तासांपेक्षा कमी झोपता? आरोग्यासाठी धोक्याची घंटा, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!
हे ही वाचा : मेनोपॉजच्या काळात आरोग्याची घ्या विशेष काळजी, काय करावे आणि काय टाळावे? पाहा डॉक्टरांचा सल्ला, Video