जायफळ खाण्याचे फायदे :
जायफळ पावडर सकाळी रिकाम्या पोटी दुधात मिसळून प्या. शरीर निरोगी ठेवण्याबरोबरच तुम्हाला आतूनही मजबूत करण्यासाठी जायफळ उपयुक्त आहे.
विशेषत: एक चमचा जायफळ पावडर दुधात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यानं तुम्हाला असंख्य फायदे मिळू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिण्याविषयी आपण ऐकलं आहे, परंतु सकाळी रिकाम्या दुधात जायफळ पावडर मिसळून पिण्याचे फायदे फार कमी लोकांना माहित आहेत.
advertisement
Digestion tips: पोट साफ होत नसेल तर या टिप्स नक्की वापरून पहा, पोट होईल स्वच्छ, तब्येत राहिल ठणठणीत
जायफळातले पोषक घटक
कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त आणि जीवनसत्त्वं यांसारखी पोषक तत्वं जायफळात मुबलक प्रमाणात आढळतात. हे अँटीऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
पचनासाठी उपयुक्त -
सकाळी रिकाम्या पोटी जायफळाचं दूध प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते. पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
झोपेची गुणवत्ता सुधारा -
जायफळात सेरोटोनिन वाढवण्याची क्षमता असते, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. निद्रानाशावर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरु शकतो.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -
जायफळातील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. सर्दी आणि इतर संक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.
मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त
जायफळाचं दूध मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं.
यामुळे मन शांत राहतं, तणाव आणि नैराश्य कमी होतं आणि स्मरणशक्ती वाढते.
त्वचेवर येते चमक
जायफळातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवू शकतात. याच्या नियमित सेवनानं मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्यांपासूनही आराम मिळतो.
शरीरासाठी ऊर्जादायी
दुधात असलेली प्रथिनं आणि जायफळातील पोषक घटक तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात.
संप्रेरकांचं संतुलन
महिलांसाठी हे दोन्ही घटक खूप फायदेशीर ठरू शकतात. कारण संप्रेरकांचं असंतुलन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
जायफळ दूध कृती
एक ग्लास कोमट दूध घ्या.
त्यात एक चमचा जायफळ पावडर घाला. ते चांगलं मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.
टीप: जायफळाचं जास्त सेवन हानिकारक असू शकतं. दररोज एक चमचे पेक्षा जास्त घेऊ नका. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
