Digestion tips: पोट साफ होत नसेल तर या टिप्स नक्की वापरून पहा, पोट होईल स्वच्छ, तब्येत राहिल ठणठणीत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पोट स्वच्छ असणं तब्येत चांगली राहण्यासाठी खूप आवश्यक आहे. तुम्हालाही पोटाचं आरोग्य सांभाळायचं असेल तर काही रामबाण घरगुती उपाय आहेत.
मुंबई : पोट स्वच्छ असणं तब्येत चांगली राहण्यासाठी खूप आवश्यक आहे. तुम्हालाही पोटाचं आरोग्य सांभाळायचं असेल तर काही रामबाण घरगुती उपाय आहेत. कारण पोट स्वच्छ ठेवणं केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे.
अनेक वेळा पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे गॅसची समस्या जाणवते. अनेकदा पोटदुखीच नाही तर डोकेदुखी सुरु होते. याशिवाय पोट स्वच्छ नसेल तर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हे टाळण्यासाठी पुढील गोष्टी टाळणं गरजेचं आहे.
खाण्याच्या चुकीच्या सवयी :
फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यानं पोट खराब होऊ शकतं.
advertisement
पाण्याची कमतरता : पुरेसं पाणी न प्यायल्यानं बद्धकोष्ठता होऊ शकते.
तणाव आणि चिंता : मानसिक तणावाचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
अव्यवस्थित दिनचर्या: झोपण्याची आणि उठण्याची ठराविक वेळ नसणं हे देखील पोट खराब होण्याचं एक कारण आहे.
advertisement
रात्री झोपण्यापूर्वी हे उपाय करुन पाहा -
1. कोमट पाणी आणि लिंबू
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात चिमूटभर मीठ किंवा एक चमचा मध घाला. झोपण्यापूर्वी हे प्यायल्यानं तुमची पचनक्रिया सक्रिय होते आणि सकाळी तुमचं पोट साफ होतं.
2. त्रिफळा चूर्ण
त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदातील औषध आहे. 1-2 चमचे त्रिफळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे पचन सुधारतं आणि आतड्यांमधून कचरा काढून टाकण्यास मदत होते.
advertisement
3. इसबगोल
एक ग्लास दूध किंवा कोमट पाण्यात १-२ चमचे इसबगोल मिसळून प्यायल्यानं बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे आतडी स्वच्छ होण्यासाठी मदत होते.
4. ओवा - बडीशेप पाणी
एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात उकळा. ते गाळून झोपण्यापूर्वी प्या. त्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होऊन पोट साफ होतं.
advertisement
5. गरम दूध आणि तूप
एका ग्लास गरम दुधात एक चमचा तूप मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी हे प्या. यामुळे आतड्यांचं कार्य सुलभ होतं.
पचनासाठी आवश्यक टिप्स
- सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या.
- तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. उदा. फळं, भाज्या आणि धान्य.
- रोज ३० मिनिटं योगा किंवा हलका व्यायाम करा.
advertisement
- अन्न वेळेवर खा आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळा.
रात्री झोपण्यापूर्वी या घरगुती उपायांचा वापर केला तर तुमची पचनक्रिया मजबूत होईल. निरोगी पचनसंस्थेसाठी नियमितता आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2024 5:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Digestion tips: पोट साफ होत नसेल तर या टिप्स नक्की वापरून पहा, पोट होईल स्वच्छ, तब्येत राहिल ठणठणीत