advertisement

Team India : 300 रन लांबच राहिले, नवख्या नामिबियाने टीम इंडियाला रोखलं, वर्ल्ड रेकॉर्ड नाहीच!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने नामिबियाविरुद्ध मोठा स्कोअर उभारला आहे, पण वर्ल्ड कपच्या इतिहासातली सगळ्यात मोठी धावसंख्या उभारण्यात टीम इंडियाला अपयश आलं.
1/6
टी-20 वर्ल्ड कपच्या या सामन्यात नामिबियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाचे ओपनर इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी पहिल्याच बॉलपासून नामिबियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.

2/6
संजू सॅमसनने 8 बॉलमध्ये 3 सिक्स आणि एका फोरच्या मदतीने 22 रन केले. तर इशान किशनने 24 बॉलमध्ये 254.17 च्या स्ट्राईक रेटने 61 रनची वादळी खेळी केली. इशानने इनिंगमध्ये 5 सिक्स आणि 6 सिक्स मारले.

3/6
इशान किशनने नामिबियाचा बॉलर स्मिटच्या एका ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि एका फोरच्या मदतीने 28 रन काढले. याचसोबत त्याने 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. इशान किशन बॅटिंग करत असताना भारत टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला सगळ्यात मोठा स्कोअर करेल, असं वाटत होतं, पण यात टीम इंडियाला अपयश आलं.

4/6
इशानची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव 12 आणि तिलक वर्मा 25 रन करून आऊट झाला. हार्दिक पांड्याने 28 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 52 रनची खेळी केली. शिवम दुबे 16 बॉलमध्ये 23 रन करून माघारी परतला. अक्षर पटेल शून्य आणि रिंकू सिंग एक रनवर आऊट झाले.

5/6
20 ओव्हरमध्ये टीम इंडियाला 209 रन करता आले. नामबियाकडून कर्णधार गेराल्ड इरासमसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, याशिवाय बेन शिकोंगो, जेजे स्मिट आणि बरनार्ड स्कोल्टस यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

6/6
2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध 260 रन केले होते. हा अजूनही टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला सर्वाधिक स्कोअर आहे. नामबियाविरुद्ध टीम इंडियाला हा विक्रम मोडता आला नाही.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement