advertisement

Diabetes : तिशीच्या टप्प्यावर व्हा अलर्ट, मीठ आणि साखरेवर करा कंट्रोल, या डाएट टिप्स नक्की वाचा

Last Updated:

गोड खाणं आणि मीठाचं प्रमाण कमी करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण यासाठी घरातले इतर पदार्थ  मदत करतात. भविष्यात मधुमेह रोखण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहारात असतात.आयुर्वेद आहाराला औषध मानतो. संतुलित आहार म्हणजे संतुलित जीवन. पाहूयात आयुर्वेदात यासाठी सुचवलेले पदार्थ.

News18
News18
मुंबई : वयाच्या तिशीपासून तब्येतीबद्दल अलर्ट होणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी, तिशीनंतर, आहारात गोड आणि मीठाचं प्रमाण निम्म्यानं कमी केलं पाहिजे.
गोड खाणं आणि मीठाचं प्रमाण कमी करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण यासाठी घरातले इतर पदार्थ  मदत करतात. भविष्यात मधुमेह रोखण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहारात असतात.आयुर्वेद आहाराला औषध मानतो. संतुलित आहार म्हणजे संतुलित जीवन. पाहूयात आयुर्वेदात यासाठी सुचवलेले पदार्थ.
मेथीचे दाणे आणि ओट्स - मेथीचे दाणे आणि ओट्स दोन्ही मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स संतुलित करण्यास मदत करतात. दोन्हीमधे ग्लुकोमनन आणि बीटा-ग्लुकन असतात, जे विरघळणारे तंतू आहेत. यामुळे रक्तातील साखरेच्या वाढीला प्रतिबंध होतो.
advertisement
दालचिनी आणि कारली - दालचिनी आणि कारली हे दोन्ही भारतीय स्वयंपाकघरातले वापरातले पदार्थ. मधुमेह टाळण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा कारली खा. जेवणात दालचिनी वापरू शकता आणि सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी पिऊ शकता. कारलं आणि दालचिनीमुळे पेशी सक्रिय राहतात, ज्यामुळे त्यांना ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करता येतो.
advertisement
हे सर्व घटक सहज उपलब्ध असतात, त्यामुळे याचा आहारात समावेश करा. यात मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि फायबर असतं आणि यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढत.
दिवसातून किमान एक फळ खाल्ल्यानं आहार पूर्ण होतो. मधुमेहींनी पेरू, सफरचंद आणि नाशपाती खावं, या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण जलद वाढण्यास प्रतिबंध होतो.
advertisement
तसंच, निरोगी दैनंदिन दिनचर्या देखील आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, दिनचर्येत अनेक बदल आवश्यक आहेत. दररोज तीस मिनिटं चालणं, हलका व्यायाम करणं, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेची पेयं टाळणं आणि शेवटी, पुरेशी झोप घेणं या गोष्टी नियमित केल्यानं प्रकृती चांगली राहिल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : तिशीच्या टप्प्यावर व्हा अलर्ट, मीठ आणि साखरेवर करा कंट्रोल, या डाएट टिप्स नक्की वाचा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement