Sakharam Binder : 37 व्या प्रयोगानंतर 'सखाराम बाइंडर'ने गाशा गुंडाळला! सयाजी शिंदेंचं गाजलेलं नाटक बंद होण्यामागे शॉकिंग कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
sakharam Binder Natak Close : अभिनेते सयाजी शिंदे यांचं गाजलेलं सखाराम बाइंडर हे नाटक नव्यानं रंगभूमीवर आलं होतं. पण अवघ्या 37 प्रयोगांनंतर हे नाटक बंद करण्याची वेळ आली.
advertisement
advertisement
advertisement
"साखाराम बाइंडरचं जे पूर्वसंचित होतं म्हणजे, तेंडुलकरांचं नाव, सयाजी शिंदे याबरोबरच मी, अनुष्का बोराडे आमचा संपूर्ण संच, या नाटाकाचा प्रयोग हे सगळं लोकांना आवडत होतं. फक्त नॉस्टेलजिया म्हणून लोक येत नव्हते. 6-6 वेळा नाटक बघणारी माणसं आहेत. मास पासून क्लास पर्यंतचे लोक आले होते. त्यांना तो अनुभव आवडत होता."
advertisement
नेहा पुढे म्हणाली, "अचानक आमच्या लक्षात आलं की, आपल्याला सांगितलं जातंय पुढच्या वेळेला देतो आणि आता जवळपास 12 प्रयोगांचे पैसे आपल्याला मिळालेले नाहीत. नाटकात नाही होत असं. मी 20 वर्ष नाटकांत काम करतेय. नाटकाचा हिरोश ज्याच्या त्या दिवशी होतो. अडवान्स बुकिंगचे पैसे आलेले असतात आणि करंट बुकींगचे पैसे लगेच मिळतात. आम्हा अनेक नाटकांत प्रयोगाच्या आधी पैसे मिळालेले आहेत."
advertisement
ती म्हणाली, "हे पैशांचं झालं. आम्हाल काही दिवसांपूर्वी पैसे मिळाले. पैशांचं नुकसान भरून निघेल. मी तीन महिने दुसरं कुठलं काय घेतलं नाही कारण यासाठी मी कमिटमेन्ट केली होती. त्यांनी राहिलेल्या दिवसांचे पैसे दिले उद्या मी त्यांना म्हटलं की माझं तीन महिन्यांचं नुकसान झालं आहे मला त्याचेही पैसे द्या कदाचित ते ही देतील. पण माझ्या क्रिएटीव्ह प्रोसेसचं काय."
advertisement
"37 व्या प्रयोगाला मी कलाकार म्हणून जिथे पोहोचले होते त्याचं काय? त्याचं पेमेंट कोण देणार? त्याचं कम्पेसेझन कोण आणि कसं करणार? हा मुद्दा कोणाच्या लक्षात येत नाही. पुन्हा प्रयोग सुरू करायचा म्हटलं तर तीन महिन्यांचा गॅप केला आहे. पुन्हा 10-15 दिवसांची तालीम करावी लागणार. पुन्हा पहिल्यापासून सुरू करावं लागणार. 37 व्या प्रयोगाला मी जिथे पोहोचले होते तिथून मी नाही सुरू करणार."









