IPL 2026 : 'सात वर्ष त्याने टीमला सर्वस्व दिलं...', तरी कॅप्टन्सी नाकारली, कोणत्या खेळाडूसाठी युवराजची तळमळ?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने वडील योगराज सिंग यांची वादग्रस्त वक्तव्य, एमएस धोनीसोबतचं नातं, कॉमेंट्री, कोचिंगसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक उत्तरं दिली आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने वडील योगराज सिंग यांची वादग्रस्त वक्तव्य, एमएस धोनीसोबतचं नातं, कॉमेंट्री, कोचिंगसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक उत्तरं दिली आहे. एका पॉडकास्टमध्ये युवराज सिंगने सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आपला शिष्य अभिषेक शर्मा याला कॅप्टन्सी न मिळाल्याबद्दलही युवराज सिंगने नाराजी व्यक्त केली आहे.
अभिषेक शर्मा हा मागच्या 2019 पासून सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये आहे. 2018 साली अभिषेक शर्माने दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं, पण पुढच्याच वर्षी म्हणजे 2019 साली अभिषेक हैदराबादच्या टीममध्ये गेला. आयपीएलच्या या मोसमात ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा हैदराबादचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे कमिन्स सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर झाला आहे, यानंतर सनरायजर्स हैदराबादने इशान किशनला टीमचं कर्णधार केलं तर अभिषेक शर्माला उपकर्णधार करण्यात आलं आहे. युवराज सिंगने या हैदराबादच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
काय म्हणाला युवराज?
'जर तुम्ही अभिषेकचा ग्राफ पाहिलात, मागच्या एक वर्षातला. जेव्हापासून त्याने टी-20 क्रिकेट खेळायला सुरूवात केली आमचे वादही व्हायचे. तुम्ही एका मॅचमध्ये आऊट व्हाल, बॉलरही बॉलिंग करायलाच आला आहे. 7 वर्षांपासून तो एका फ्रॅन्चायजीसाठी खेळत आहे, परफॉर्म करत आहे. टीमसाठी त्याने सर्वस्व दिलं आहे. तो राज्याची कॅप्टन्सी करत आहे आणि त्याला फ्रॅन्चायजीची कॅप्टन्सी दिली जात नाही', असं युवराज सिंग म्हणाला आहे.
advertisement
कपिल देव-धोनीची माफी
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कपिल देव आणि एमएस धोनीबद्दल अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, यावरही युवराज बोलला आहे. असं बोलणं योग्य नाही, हे मी वडिलांना सांगितलं. मला कपिल देव आणि धोनीची माफी मागायची आहे, असं युवराज म्हणाला.
त्यांच्यासोबत कॉमेंट्री नाही
'ज्या लोकांनी बसून माझ्याबद्दल गोष्टी बोलल्या आहेत, क्रिकेटबद्दल नाही, वैयक्तिक गोष्टी, अशा लोकांसोबत मला बसायचं नाही, त्यामुळे मी कॉमेंट्री करत नाही', असं वक्तव्यही युवराज सिंगने केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'सात वर्ष त्याने टीमला सर्वस्व दिलं...', तरी कॅप्टन्सी नाकारली, कोणत्या खेळाडूसाठी युवराजची तळमळ?








