advertisement

Water Supply Shutdown: वसई- विरारकरांनो पाणी जपून वापरा! आठवडाभर राहणार पाणीपुरवठा बंद; नेमकं कारण काय?

Last Updated:

वसई, विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये पुढचा एक आठवडा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. झोनल पद्धतीने नागरिकांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

News18
News18
वसई- विरार: वसई आणि विरारकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वसई आणि विरारमध्ये पुढचा एक आठवडा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. वेगवेगळ्या परिसरामध्ये टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याची सूचना एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. शटडाऊनच्या काळामध्ये, शहरात कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होणार असून महानगरपालिकेने झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या तारखेपासून वसई- विरार परिसरात पाणी बंद राहणार आहे, जाणून घेऊया....
वसई- विरार परिसरामध्ये येत्या ४ एप्रिल ते ११ एप्रिलपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. येत्या शनिवारपासून हा पाणी पुरवठा बंद होणार असून पुढच्या आठवड्यातील शुक्रवारपर्यंत पाणी पुरवठा कायम बंद राहणार आहे. एमएमआरडीएकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने वसई- विरारकरांना करण्यात आले आहे. सध्या वसई- विरारमधल्या नागरिकांना 400 दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. पण सध्या नागरिकांना सूर्या पाणी पुरवठा योजनेतून आणि एमएमआरडीएच्या योजनेतून शहराला 350 दशलक्ष लीटर इतके पाणी मिळतेय.
advertisement
सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील टेक्निकल कामे एमएमआरडीएच्या हातातून घेण्यात आले आहेत. हाती घेतलेल्या कामामुळे नागरिकांसाठी शटडाऊनच्या काळामध्ये 150 दशलक्ष लीटर पाणी पूर्णपणे बंद राहिल. सात दिवस, सात वेगवेगळ्या झोनिंगच्या माध्यमातून हे पाणी बंद राहणार आहे. सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी वसई- विरारमधील परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शिवाय, इतरत्र भागांमध्ये अपुरा आणि कमी दाबाचा पाणी पुरवठा होणार असल्यामुळे महानगरपालिकेकडून नागरिकांना पाण्याचा साठा जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
कोणकोणत्या परिसरामध्ये कोणकोणत्या दिवशी पाणी पुरवठा खंडित केला जाईल...
  • शनिवार- 4 एप्रिल रोजी विरार पूर्व आणि विरार पश्चिम परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
  • रविवार- 5 एप्रिल रोजी नालासोपारा पूर्व आणि नालासोपारा पश्चिम परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
  • सोमवार- 6 एप्रिल रोजी नवघर आणि वसई परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
  • मंगळवार- 7 एप्रिल रोजी विरार पूर्व आणि विरार पश्चिम परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
  • बुधवार- 8 एप्रिल रोजी नालासोपारा पूर्व आणि नालासोपारा पश्चिम परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
  • गुरूवार- 9 एप्रिल रोजी नवघर आणि वसई परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
  • शुक्रवार- 10 एप्रिल रोजी विरार पश्चिम आणि नालासोपारा पश्चिम परिसरामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान, शटडाऊनच्या काळात नागरिकांनी महानगरपालिकेला आणि एमएमआरडीएला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शटडाऊनच्या काळमध्येच नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावू शकते. त्यानंतर सुद्धा पुढे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाण्याचा प्रश्न हळूहळू पूर्वपदावर येईल.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Water Supply Shutdown: वसई- विरारकरांनो पाणी जपून वापरा! आठवडाभर राहणार पाणीपुरवठा बंद; नेमकं कारण काय?
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement