Mumbai News: चित्रपट पाहायला गेले अन् अपघात झाला... भांडूपच्या रस्त्यावर 'हिट अँड रन'चा थरार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
भांडूपच्या रस्त्यावर 'हिट अँड रन'ची घटना घडली आहे. मॉलच्या एक्झिट गेटवर रिक्षाची वाट पाहत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने एका 52 वर्षीय व्यक्तीला जोरात धडक दिली आहे.
मुंबई: मुंबईमध्ये एका फॅमिलीला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं भोवलं आहे. मध्यरात्रीच्या वेळी भांडूपमधील मेट्रो मॉलमधून चित्रपट पाहून घरी परतत असताना एका कार चालकाने या तिघांनाही जोरात धडक दिली आहे. चित्रपट संपल्यानंतर घरी जाण्यासाठी हे तिघंही एल.बी.एस रोडवरील मॉलच्या एक्झिट गेटवर रिक्षाची वाट पाहत होते. रिक्षाची वाट पाहत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरात धडक दिली. या घटनेमध्ये, 52 वर्षीय, विकास हरचिलकर यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
28 मार्चला, शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा भांडूप परिसरामध्ये अपघात घडला आहे. या 'हिट अँड रन' प्रकरणात ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनास्थळावरून फरार झालेल्या ह्या ड्रायव्हरचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. अपघातावेळी, विकास यांच्यासोबत त्यांची पत्नी 48 वर्षीय प्रगती हरचिलकर आणि मुलगा 24 वर्षीय रितेश हरचिलकर सुद्धा उपस्थित होते. पण त्यांना काहीही दुखापत झाली नाही किंवा त्यांना कुठेही खरचटले सुद्धा नाही. विकास हरचिलकर यांनाच त्या कार ड्रायव्हरने जोरात धडक देऊन त्यांना काही अंतरावर फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
advertisement
पुढे गेल्यानंतर कार ड्रायव्हरने कार एका ठिकाणी थांबवली. पण त्याने हरचिलकर यांना कोणतीही मदत न करता तिथून फरार झाला. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अपघातात विकास हरचिलकरांच्या डोक्याला आणि चेहेऱ्याला गंभीर दुखापत झालेली आहे. घटनेनंतर त्यांना तात्काळ भांडूपमधल्या एका खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भांडूप पोलीस ठाण्यामध्ये कार ड्रायव्हरविरोधात निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करणे आणि अपघातानंतर मदत न करता पळून जाण्याच्या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 6:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: चित्रपट पाहायला गेले अन् अपघात झाला... भांडूपच्या रस्त्यावर 'हिट अँड रन'चा थरार










