advertisement

IPL 2026 : इथे मीच बॉस! एकट्या रहाणे समोर ऑस्ट्रेलिया बोर्ड झुकलं, स्टार खेळाडूला वठणीवर आणलं

Last Updated:

अजिंक्य राहणेच्या रहाणेच्या एका खेळीसमोर अक्षरश ऑस्ट्रेलियाच क्रिकेट बोर्ड झुकलं आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू देखील वठणीवर आला आहे.त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

Camron green Ajinkya Rahane
Camron green Ajinkya Rahane
Ajinkya Rahane camron Green : आयपीएलमध्ये आज कोलकत्ता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद कोलकत्ताच्या ईडन गार्डनमध्ये भिडणार आहेत.या सामन्याआधी कोलकत्ता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने मोठा डाव टाकला आहे. रहाणेच्या या खेळीसमोर अक्षरस ऑस्ट्रेलियाच क्रिकेट बोर्ड झुकलं आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू देखील वठणीवर आला आहे.त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सला मुंबई इंडियन्स विरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स ही 220 धावांचे लक्ष्य ठेवून हारली होती. कारण मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत 6 विकेट राखून हा सामना जिंकला होता.
advertisement
या पराभवावर बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, मला वाटतं 220-225 ही एक चांगली धावसंख्या होती.आम्ही खूप चांगली फलंदाजी केली,पण पुन्हा एकदा,गोलंदाजीचा ताफा नवखा आहे.ही मुलं शिकतील.मुंबई इंडियन्ससारख्या मजबूत फलंदाजी फळीविरुद्ध खेळणं हा आमच्यासाठी एक शिकण्याचा अनुभव आहे.वैभव, कार्तिक,मुझारबानी हे आयपीएलमध्ये नवीन आहेत,तर दोन अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत, पण मला वाटतं मुंबई इंडियन्सने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे आमचे गोलंदाज नक्कीच शिकतील.
advertisement
दरम्यान कॅमरन ग्रीनने गोलंदाजी का केली नाही? असे विचारताच अजिंक्य रहाणेने हा प्रश्न तुम्हाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारावा लागेल, अशी धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती.त्यामुळे मोठा वाद पेटला होता.विशेष म्हणजे या वादानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने यावर आपली भूमिका मांडली होती.
advertisement
टी20 वर्ल्ड कपमध्ये कॅमरन ग्रीनच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली असून,त्यावर उपचार सुरू आहेत, परंतु त्याला काही काळासाठी गोलंदाजीपासून दूर राहावे लागेल,असे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले होते. तसेच केकेआरला याबद्दल कळवण्यात आले असून, त्यांना या माहितीची पूर्ण कल्पना होती,असेही बोर्डाने पुढे स्पष्ट केले होते.
advertisement
पण ऑस्ट्रेलियन बोर्डाने या वादावर स्पष्टीकरण देऊन देखील त्यांना कोलकत्ताचा कॅप्टन अजिंक्य रहाणेसमोर झूकावे लागले आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रहाणेने असं नेमकं केलं काय? तर रहाणेने कॅमरन ग्रीनचा गोलंदाजीचा प्रश्न उपस्थित केल्याने, त्याला नाईलाजाने गोलंदाजीचा सराव करावा लागतो आहे. या सरावाचा व्हिडिओ देखील कोलकत्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.त्यामुळे आता रहाणेच्या त्या स्पष्ट वक्तव्यामुळे आस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला झुकावे लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : इथे मीच बॉस! एकट्या रहाणे समोर ऑस्ट्रेलिया बोर्ड झुकलं, स्टार खेळाडूला वठणीवर आणलं
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement