Urine : लघवीचा रंग पिवळा होणं हे मधुमेहाचे लक्षण आहे का? शरीरातील 'हा' बदल नक्की काय सुचवतो
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यामागे नक्की काय विज्ञान आहे आणि आपण कधी सावध व्हायला हवं, हे सविस्तर समजून घेऊया.
सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरात कधीतरी लघवीचा रंग बदललेला दिसला की आपल्या मनात पहिली शंका येते ती म्हणजे, काही आजार तर झाला नसेल ना? अनेकदा आपण गुगलवर शोधतो किंवा सोशल मीडियावर चर्चा पाहतो आणि तिथल्या अर्धवट माहितीमुळे घाबरून जातो. सध्या सोशल मीडियावर आणि Quora सारख्या प्लॅटफॉर्मवर एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे, लघवी पिवळी होणे हे वाढलेल्या रक्तातील साखरेचे लक्षण आहे का?
advertisement
advertisement
advertisement
पाण्याची कमतरता : जर तुम्ही दिवसभरात पुरेसे पाणी प्यायले नसेल, तर लघवी गडद पिवळी होऊ शकते. हे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षण आहे.जर तुम्ही काही विशिष्ट औषधे किंवा व्हिटॅमिन सप्लीमेंट्स घेत असाल, तरीही लघवीचा रंग बदलू शकतो.शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरियाशी लढा सुरू असताना किंवा युरिन इन्फेक्शन (UTI) असल्यास रंग गडद होऊ शकतो.
advertisement
पिवळी लघवी आणि मधुमेह यांचा संबंध काय?जरी पिवळी लघवी म्हणजे नेहमीच मधुमेह नसला, तरी यांच्यात एक तांत्रिक संबंध नक्कीच आहे. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढते, तेव्हा शरीर ती जास्तीची साखर लघवीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत शरीरातून पाण्याचे प्रमाणही जास्त बाहेर जाते. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते आणि पर्यायाने लघवीचा रंग गडद पिवळा दिसू लागतो.
advertisement
मधुमेहाची खरी लक्षणे कोणती?केवळ लघवीच्या रंगावरून निष्कर्षापर्यंत पोहोचण्याऐवजी, टाइप 2 मधुमेहाच्या या लक्षणांकडे लक्ष द्या1. वारंवार लघवीला होणे: विशेषतः रात्रीच्या वेळी पुन्हा पुन्हा जावे लागणे.2. अतिशय तहान लागणे: पाणी पिऊनही तोंड सुकल्यासारखे वाटणे.3. सतत थकवा: भरपूर विश्रांती घेऊनही सुस्ती आणि थकवा जाणवणे.4. दृष्टी कमी होणे: डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा अस्पष्ट दिसणे.5. जखम लवकर न भरणे: साध्या जखमा भरून येण्यास खूप वेळ लागणे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







