AC सुरू असताना छताचा पंखा चालवावा की नाही? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतं वीज बिल; जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही जणांना वाटतं की, पंखा सुरू ठेवल्याने गरम हवा खाली येईल आणि एसीचा थंडावा कमी होईल. तर काही जण मानतात की पंख्यामुळे एसीवरचा ताण कमी होतो. नक्की सत्य काय आहे?
advertisement
advertisement
advertisement
एसीमधून निघणारी ठंडी हवा जड असते, त्यामुळे ती जमिनीलगत साचून राहते. छताचा पंखा ही थंड हवा संपूर्ण खोलीत पसरवण्याचं काम करतो. यामुळे खोलीचा कोपरा अन् कोपरा लवकर थंड होतो. जेव्हा पंखा फिरतो, तेव्हा तो आपल्या शरीरावरील घाम लवकर सुकवतो, ज्यामुळे आपल्याला एसीच्या ठराविक तापमानापेक्षाही जास्त थंडावा जाणवतो.
advertisement
advertisement
advertisement
1. तापमान 24-26 वर सेट करा: एसी 18 किंवा 20 अंशावर चालवण्याऐवजी तो 24 ते 26 अंशावर ठेवा. हा मानवी शरीरासाठी सर्वात आरामदायक कम्फर्ट झोन आहे. 2. पंखेचा वेग कमी ठेवा: पंखा फुल स्पीडवर न ठेवता किमान (Minimum) वेगावर ठेवा. यामुळे थंड हवा विस्कळीत न होता व्यवस्थित पसरते. 3. खिडक्या-दारे बंद ठेवा: हे सांगण्याची गरज नाही की, एसीचा गारवा बाहेर जाऊ नये म्हणून सर्व दारे आणि खिडक्या नीट बंद असल्याची खात्री करा.
advertisement
advertisement






