advertisement

ब्रम्हचारी की विवाहित? भारतातील एक असं मंदिर जिथे पत्नीसह केली जाते हनुमानाची पूजा, काय आहे नेमकं सत्य?

Last Updated:
संकटमोचन हनुमान हे 'बालब्रह्मचारी' म्हणून ओळखले जातात. देशभरातील लाखो मंदिरांमध्ये हनुमानाची मूर्ती एकटी किंवा प्रभू श्रीरामांच्या चरणांशी असल्याचे आपण पाहतो. मात्र, भारतात एक असे दुर्मिळ आणि एकमेव मंदिर आहे, जिथे हनुमान बालब्रह्मचारी रूपात नसून चक्क आपल्या 'पत्नीसह' विराजमान आहेत.
1/7

2/7
हनुमानाने आपले संपूर्ण आयुष्य प्रभू श्रीरामाच्या भक्तीमध्ये समर्पित केले. आपण हनुमानाला बालब्रम्हचारी मानतो पण काही धर्मग्रंथानुसार हनुमानाचा विवाह झाला असल्याचे म्हटले आहे. काय आहे यामागची नेमकी कथा जाणून घेऊ.

3/7
भारतात असे एक मंदिर आहे, जिथे महाबली हनुमान त्यांच्या पत्नीसह विराजमान आहेत. भक्त त्यांची सपत्नीक पूजा करतात. पण, हनुमानाचे लग्न कधी आणि कोणाशी झाले, आणि लग्न झाले तर मग हनुमानाला ब्रह्मचारी का म्हटले जाते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

4/7
हनुमानाचे गुरु सूर्यदेव होते. हनुमानाने सूर्यदेवांकडून 9 व्याकरण विद्यांपैकी 5 विद्या आत्मसात केल्या होत्या, परंतु उरलेल्या 4 विद्या केवळ 'विवाहित' व्यक्तीलाच शिकवल्या जाऊ शकत होत्या. हनुमानाला सर्व विद्यांमध्ये पारंगत व्हायचे होते, पण त्यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती. असे असताना त्यांना लग्न करणे अनिवार्य होते.

5/7
यावर उपाय म्हणून सूर्यदेवांनी आपली कन्या 'सुवर्चला' हिच्याशी हनुमानाचा विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. सुवर्चला ही 'तपस्विनी' होती आणि विवाहा नंतरही तिने आपले तप सुरू ठेवण्याचे ठरवले होते. अशा प्रकारे, विवाहाची अट पूर्ण झाली आणि हनुमानाचे ब्रह्मचर्यही अबाधित राहिले, कारण हा विवाह केवळ ज्ञानप्राप्तीसाठी होता.

6/7
आता प्रश्न असा की भारतात कुठे आहे असं मंदिर जिथे हनुमानाची सपत्नीक पूजा केली जाते. तर हे मंदिर तेलंगणा राज्यातील हैदराबादपासून सुमारे 220 किमी अंतरावर असलेल्या खम्मम जिल्ह्यात हे प्रसिद्ध मंदिर असून, त्याचे नाव 'श्री सुवर्चला सहिता हनुमान मंदिर' असे आहे.

7/7
खम्मम येथील या मंदिरात हनुमान आणि सुवर्चला माता यांच्या मूर्ती शेजारी-शेजारी असून त्यांची विधीवत पूजा केली जाते. असे मानले जाते की, ज्या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत वाद किंवा तणाव असतो, त्यांनी या मंदिरात येऊन जोडीने दर्शन घेतल्यास त्यांचे संबंध सुधारतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement