Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक मोठा स्कॅम उघड, 130 खाती, अनेक अधिकारी अन्...
- Published by:Sachin S
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
एकच दिवशी या खात्यात लाखोंचा व्यवहार होत होता. विशेष म्हणजे, या बनावट खात्यात जासूद, रुपाली चाकणकर यांच्या भगिनीसह पुतण्याच्या नावं खात्यात असल्याचं समोर आलं आहे.
शिर्डी: बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. पण, त्याची रोज नव नवीन प्रकरणं समोर येत आहे. शिर्डीतील जमीन लाटण्याचं प्रकरण असेल किंवा गुंतवणूक प्रखरण असेल, सगळीच प्रकरण संशयास्पद असून चौकशी सुरू आहे. अशातच खरातने तब्बल १३० बनावट खाती उघडून कोट्यवधीचा व्यवहार केल्याचा प्रकार आता समोर आहे. धक्कादायक म्हणजे, यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसह अनेक अधिकाऱ्यांच्या नावाने खाती होती, अशीही माहिती आता समोर आली आहे.
अशोक खरातची एसआयटी आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अशोक खरातची आणखी एक काळी बाजू समोर आली आहे. शिर्डीच्या फसवणूक गुन्ह्यात मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरातने 130 बनावट खाती उघडून कोट्यावधीचा व्यवहार केल्याची माहिती आता समोर आली आहे.
2021/2022 साली अनेकांच्या नावे पतसंस्थेत खाती उघडली होती. समता पतसंस्थेसह, जगदंब पतसंस्थेत देखील बनावट खाती उघडण्यात आली होती. प्रत्येक खात्याला अशोक खरात नाॅमिनी होता. जवळपास पन्नास कोटी रूपयांपेक्षा जास्त व्यवहार करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
advertisement
चाकणकर यांच्या बहिणीचं नावही खात्यात
एकच दिवशी या खात्यात लाखोंचा व्यवहार होत होता. विशेष म्हणजे, या बनावट खात्यात जासूद, रुपाली चाकणकर यांच्या भगिनीसह पुतण्याच्या नावं खात्यात असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने देखील खाती असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली आहे.
शिर्डीतील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपींनी पोलिसांना तपासामध्ये ही माहिती दिली. सावकारकी प्रकरणी दोन दिवसांपूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. शिर्डी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. तपासात अजूनही मोठी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 6:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक मोठा स्कॅम उघड, 130 खाती, अनेक अधिकारी अन्...







