Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Silver Prices: गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत बरीच चढ-उतार होताना दिसत आहे. अशात टेक्निकल एक्सपर्ट एवी गिल्बर्ट एक मोठा इशारा दिला आहे.
मुंबई: सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. टेक्निकल एक्सपर्ट एवी गिल्बर्ट यांच्या मते सोने $3,800 पर्यंत घसरू शकते तर चांदी $40 पर्यंत खाली येऊ शकते. याशिवाय यावर्षाच्या अखेरीस कच्च्या तेलाच्या किमतीबाबतही त्यांनी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
सोने कमी झाले की गुंतवणूकदार घाबरतात आणि तेच वेगाने वाढले की लोभ वाढतो. अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदार गोंधळात पडतो की आत्ता खरेदी करावी की थांबावे? याच पार्श्वभूमीवर अनुभवी तांत्रिक विश्लेषक एवी गिल्बर्ट यांनी मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या मते सोने आणि चांदीमध्ये अजून घसरण होऊ शकते. मात्र याच घसरणीत मोठ्या गुंतवणुकीच्या संधी दडलेल्या आहेत.
advertisement
एवी गिल्बर्ट हे प्रसिद्ध अमेरिकन मार्केट अॅनालिस्ट असून ते ElliottWaveTrader.net चे संस्थापक आहेत. हे प्लॅटफॉर्म लाईव्ह ट्रेडिंग आणि मार्केट अॅनालिसिससाठी ओळखले जाते. त्यांची गणना जगातील आघाडीच्या तांत्रिक विश्लेषकांमध्ये केली जाते.
अलीकडेच सोन्याने 1980 नंतरची सर्वात मोठी मासिक घसरण अनुभवली. मात्र त्यानंतर पुन्हा किंमत $4,700 प्रति औंसच्या वर गेली. यावरून बाजार अजून स्थिर नसून मोठे चढ-उतार सुरू असल्याचे दिसते. सध्या सोने अंदाजे $4,775 च्या आसपास ट्रेड होत आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना वाटू शकते की घसरण थांबली आहे, पण अजूनही चित्र स्पष्ट नाही.
advertisement
गिल्बर्ट यांच्या मते ही घसरण अजून संपलेली नाही. त्यांच्या अंदाजानुसार सोने $4,000 च्या खाली जाऊन $3,800 पर्यंत येऊ शकते. म्हणजेच सध्याच्या पातळीवरून जवळपास 20% पर्यंत आणखी घसरण होऊ शकते. रुपयांत हे सुमारे 1.18 लाखांपर्यंत जाऊ शकते. जरी हे ऐकायला धक्कादायक वाटत असले तरी मार्केटमध्ये असे होणे अनोखे नाही.
त्यांनी सोन्यासाठी दोन संभाव्य मार्ग सांगितले आहेत. पहिल्या परिस्थितीत किंमती सध्याच्या आसपास स्थिर राहून हळूहळू खाली येऊ शकतात. मात्र दुसरा मार्ग अधिक धोकादायक आहे. ज्यात सोने आधी $4,800 पार करून $5,200 पर्यंत जाऊ शकते आणि त्यानंतर अचानक मोठी घसरण होऊ शकते. त्यांनी सांगितले की हा मार्ग जास्त फसवणूक करणारा आहे. कारण वाढलेल्या किमती पाहून लोकांना वाटेल की घसरण संपली आहे; पण खरी घसरण तेव्हाच सुरू होईल.
advertisement
चांदीबाबतही त्यांनी असेच संकेत दिले आहेत. जर चांदीची किंमत मार्चमधील उच्चांकाच्या खाली राहिली; तर ती $53.50 पर्यंत घसरू शकते. म्हणजेच चांदीतही सध्या धोका कायम आहे आणि घाईत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.
गिल्बर्ट यांनी ट्रेडर आणि गुंतवणूकदार यांच्यातील फरकही स्पष्ट केला. ट्रेडर अल्पकालीन नफा पाहतात, तर गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवतात. जर सोने आणि चांदी खाली येऊन मजबूत सपोर्ट घेतात, तर ते गुंतवणूकदारांसाठी चांगली खरेदीची संधी ठरू शकते. मात्र त्यानंतरची तेजी ठरवेल की बाजार दीर्घकाळ मजबूत राहील की नाही.
advertisement
त्यांनी सध्याचा मार्केट स्ट्रक्चर 2011 सारखा असल्याचेही सांगितले. त्या काळातही आधी घसरण झाली आणि त्यानंतर मोठा ट्रेंड तयार झाला होता. इतिहास पुन्हा घडल्यास पुढील काही महिन्यांत बाजाराची दिशा निश्चित होईल.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांदीबाबत त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यांच्या मते पुढील 10 वर्षांच्या दृष्टीने $60 च्या खालील किंमत खरेदीसाठी उत्तम संधी ठरू शकते. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले की किंमत $40 पर्यंतही घसरू शकते. त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे.
advertisement
सोने-चांदी व्यतिरिक्त त्यांनी माइनिंग स्टॉक्समध्येही संधी असल्याचे सांगितले. काही माइनिंग कंपन्यांचे शेअर्स भविष्यात सोने-चांदीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात, असे त्यांचे मत आहे. कच्च्या तेलाबाबत त्यांनी सांगितले की सध्या किंमतीत थोडी वाढ दिसू शकते, मात्र वर्षाच्या अखेरीस क्रूड ऑईल $50 च्या खाली जाऊ शकते. त्यांचा संपूर्ण अंदाज हा टेक्निकल चार्ट्सवर आधारित असून येत्या काही महिन्यांत बाजारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 7:07 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार








