advertisement

Kitchen Tips : फ्रिजमधलं दही किती दिवस चांगलं राहतं? खराब झालंय की नाही, चव न घेता कसं ओळखाल?

Last Updated:
बऱ्याचदा आपल्याला केवळ नजरेनं पाहून हे ओळखता येत नाही की, दही खराब झालंय की चांगलं आहे. दही चाखणंही शक्य नसतं. कारण खराब दही पोटात गेल्यास चुकीचे परिणाम होऊ शकतात.
1/9
उन्हाळ्यात प्रत्येक घरात दही असतंच असतं. काहीवेळा हे दही खूपकाळ राहतं. दही फ्रिजमध्ये असल्यामुळे ते लवकर खराब होणार नाही अशी आपल्याला आशा असते. मात्र प्रत्येकवेळी तास होईलच असं नाही. म्हणून दही आपल्याला तपासता आलं पाहिजे.

2/9
बऱ्याचदा आपल्याला केवळ नजरेनं पाहून हे ओळखता येत नाही की, दही खराब झालंय की चांगलं आहे. अशावेळी दही चाखणंही शक्य नसतं. कारण खराब दही पोटात गेल्यास त्याचे चुकीचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. खराब दही खाल्ल्याने अन्नातून विषबाधा आणि पोटदुखी देखील होऊ शकते.

3/9
आता प्रश्न पडतो की, दह्याची चव न घेता ते खराब झालंय की चांगलं आहे, हे कसं ओळखावं. तर तुम्ही ते नक्कीच तपासू शकता. यासाठी काही छोट्या छोट्या बदलांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल.

4/9
सर्वात आधी तर दह्याच्या वर जे पाणी जमा होतं, त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. दह्यावर थोडं पाणी असणं सामान्य आहे. पण जर पाणी खूप जास्त असेल आणि दही आटून रबरासारखं झालं असेल, तर ते दही खराब झाल्याचं लक्षण असतं. असं दही अजिबात वापरू नका.

5/9
दही चांगलं असेल तर ते मलईदार आणि गुळगुळीत दिसतं. पण जर तुम्हाला दह्यामध्ये लहान दाणे, गुठळ्या किंवा चिकट जेलीसारखा भाग दिसला, तर याचा अर्थ दह्यामध्ये जिवाणू वाढले आहेत. असं दही खाल्लंत तर त्यामुळे पोटाचा संसर्ग होऊ शकतो.

6/9
दही कायम दुधासारखं पांढरं शुभ्र दिसावं. पण जर दह्याचा रंग बदलला असेल, त्यावर दह्यावर हलके पिवळे, गुलाबी किंवा राखाडी डाग दिसत असतील किंवा दह्यावर पांढऱ्या कापसासारखं काही दिसत असेल, तर दही ताबड्तोन फेकून द्या. ते निश्चितच खराब झालंय.

7/9
दह्याच्या वासावरून तुम्हाला लगेच अंदाज येतील. फ्रेश दह्याला हलका सुगंध असतो. फ्रिजमधून तुम्ही दही काढलंत आणि त्याला तीव्र आंबट, सडलेला किंवा शिळा वास येत असेल, तर ते दही नक्कीच खराब झालंय.

8/9
तुम्ही घरी डब्यातलं किंवा पॅकेटचं दही आणलं असेल आणि ते पॅकेट किंवा डबा फुगलेला दिसत असेल तर समजून जा, जास्त आंबल्यामुळे आतमध्ये वायू तयार झालाय. म्हणजेच ते दही आता खाण्यायोग्य राहिलेलं नाही.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement