IPL 2026 : दिल्लीच्या डगआऊटमध्ये मोठा सीन, बॅटिंगला निघालेल्या मिलरला कोचने थांबवलं, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आपला पहिलाच सामना जिंकला आहे. लखनऊ सुपरजाएंट्सने दिलेलं 142 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दिल्लीची अवस्था 26/4 अशी झाली होती.
लखनऊ : आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आपला पहिलाच सामना जिंकला आहे. लखनऊ सुपरजाएंट्सने दिलेलं 142 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दिल्लीची अवस्था 26/4 अशी झाली होती, त्यामुळे लखनऊचा विजय होईल असं वाटत होतं. पण समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात झालेल्या नाबाद पार्टनरशीपमुळे दिल्लीचा विजय झाला. समीर रिझवी याला या सामन्यात दिल्लीने इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवलं. सुरूवातीला आशुतोष शर्मा इम्पॅक्ट सब म्हणून खेळेल, असं वाटत पण दिल्लीने शेवटच्या क्षणी निर्णय बदलला आणि समीर रिझवीला बॅटिंगला पाठवलं.
दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल प्रिन्स यादवच्या बॉलिंगवर बोल्ड झाला. यानंतर डेव्हिड मिलर बॅटिंगसाठी जात होता, पण तेवढ्यात ड्रेसिंग रूममधून दिल्लीचा हेड कोच हेमांग बदानी धावत आला आणि त्याने डेव्हिड मिलरला थांबवलं. तू बॅटिंगला जाऊ नकोस स्टब्स जात असल्याचं हेमांग बदानीने मिलरला सांगितलं, यानंतर मिलर हेल्मेट बाजूला ठेवून तिथेच बसला.
The decision which changed the fortune of Delhi capitals last night
Hemant Badani makes a bold decision to bring in Stubbs before Miller and then everything changed pic.twitter.com/W6nIC0wpwa
— Achyut Mishra (@achyutmis22) April 2, 2026
advertisement
रिझवी-स्टब्सची 119 रनची पार्टनरशीप
दिल्लीचा हेड कोच हेमांग बदानीच्या या एका निर्णयामुळे मॅचचा निकाल फिरला. रिझवी आणि स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी 119 रनची नाबाद पार्टनरशीप झाली आणि दिल्लीने हा सामना 17 बॉल शिल्लक असताना जिंकला. रिझवीने 47 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 70 रन केले. तर स्टब्सने 32 बॉलमध्ये 3 फोर आणि एक सिक्स मारत 39 रनची खेळी केली. या दोघांनी लखनऊच्या सगळ्या बॉलरवर आक्रमण केलं, ज्यांनी दिल्लीची टॉप-ऑर्डर उद्ध्वस्त केली होती.
advertisement
लखऊनच्या बॉलर्सनी 4.3 ओव्हरमध्येच दिल्लीच्या 4 विकेट घेतल्या होत्या. केएल राहुल पहिल्याच बॉलला आऊट झाला, तर पाथुम निसांका चौथ्या ओव्हरला पॅव्हेलियनमध्ये परतला. पाचव्या ओव्हरमध्ये प्रिन्स यादवने नितीश राणा आणि अक्षर पटेलला आऊट केलं.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
Apr 02, 2026 5:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : दिल्लीच्या डगआऊटमध्ये मोठा सीन, बॅटिंगला निघालेल्या मिलरला कोचने थांबवलं, Video









