Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा पहिली बळी, झाड कोसळलं, महिलेचा जागेवरच मृत्यू
- Published by:Sachin S
Last Updated:
तासभर झालेल्या पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. अचानक झालेल्या या पावसाने पहिला बळी घेतला आहे.
अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे: पुण्यात अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. तासभर झालेल्या पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. अचानक झालेल्या या पावसाने पहिला बळी घेतला आहे. सिंहगड रोड परिसरात झाड कोसळलं. या दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सिंहगड परिसरात पावसाने धुमशान घातलं होतं. स नवश्या मारुती मंदिराजवळील सिंहगड रोड इथं पावसामुळे झाडं कोसळलं. या झाडाखाली ३ जण अडकले होते. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. रंजना नवनाथ गिरी असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला जागीच ठार झाली. पावसामुळे कोसळलेल्या झाडाखाली तिघे जण अडकले होते.
advertisement
पुण्यात मुसळधार अवकाळी पावसाने घेतला महिलेचा बळी,
पावसामुळे कोसळले झाड झाडाखाली तिघे अडकले pic.twitter.com/ptKyVBloYu
— VIRALबाबा (@viralmedia70) April 2, 2026
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पण, रंजना गिरी यांचा जागेवरच मृत्यू झाला. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
ठिकठिकाणी साचलं पाणी
दरम्यान, दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. कोंडवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड तसंच पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. काही भागात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पाण्यात अडकून वाहनं बंद पडल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज वर्तवला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 6:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा पहिली बळी, झाड कोसळलं, महिलेचा जागेवरच मृत्यू








