advertisement

Gaurav More: 'चला हवा येऊ द्या' मध्ये गेला, मग 'हास्यजत्रा'मध्येच का नाही परतला? चाहत्यांच्या प्रश्नांवर अखेर गौरव मोरेने सोडलं मौन

Last Updated:
Gaurav More: चाहत्यांच्या मनात एकच खदखद होती, "गौरव, जर तुला स्कीटच करायचं होतं, तर मग 'हास्यजत्रे'च्या कुटुंबात का नाही परतलास?" या प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर गौरवने आता अत्यंत रोखठोकपणे यामागचं उत्तर दिलं आहे.
1/7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील तो पवईच्या फिल्टरपाड्याचा गडी, ज्याच्या एका एक्सप्रेशनवर अवघा महाराष्ट्र फिदा झाला, तो गौरव मोरे सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील तो पवईच्या फिल्टरपाड्याचा गडी, ज्याच्या एका एक्सप्रेशनवर अवघा महाराष्ट्र फिदा झाला, तो गौरव मोरे सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
advertisement
2/7
गौरवने हास्यजत्रा सोडली, हिंदीचा रस्ता धरला आणि पुन्हा मराठी पडद्यावर येताना मात्र 'चला हवा येऊ द्या'ची वाट धरली.
गौरवने हास्यजत्रा सोडली, हिंदीचा रस्ता धरला आणि पुन्हा मराठी पडद्यावर येताना मात्र 'चला हवा येऊ द्या'ची वाट धरली.
advertisement
3/7
मात्र, चाहत्यांच्या मनात एकच खदखद होती,
मात्र, चाहत्यांच्या मनात एकच खदखद होती, "गौरव, जर तुला स्कीटच करायचं होतं, तर मग 'हास्यजत्रे'च्या कुटुंबात का नाही परतलास?" या प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर गौरवने आता अत्यंत रोखठोकपणे यामागचं उत्तर दिलं आहे.
advertisement
4/7
'नाईन माईंड्स क्रिएशन'ला दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने आपल्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने सांगितलं. अनेक प्रेक्षकांना वाटलं की गौरवने एका रात्रीत हा निर्णय घेतला, पण हिशोब मांडताना गौरव म्हणाला,
'नाईन माईंड्स क्रिएशन'ला दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने आपल्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने सांगितलं. अनेक प्रेक्षकांना वाटलं की गौरवने एका रात्रीत हा निर्णय घेतला, पण हिशोब मांडताना गौरव म्हणाला, "२०२४ च्या एप्रिलमध्ये मी हिंदी शोसाठी हास्यजत्रा सोडली होती. त्यानंतर २०२५ मध्ये 'चला हवा येऊ द्या' सुरू झालं. या दोन्हीच्या दरम्यान जवळपास ३६५ दिवसांचा काळ गेला. हा काळ माझ्यासाठी बदलाचा होता."
advertisement
5/7
गौरवने स्पष्ट केलं की, त्याला कामात आलेला तोचतोचपणा नको होता. एकाच साच्यात अडकण्यापेक्षा स्वतःला पुन्हा एकदा शून्य करून नवीन लोकांसोबत काम करण्याची त्याची इच्छा होती.
गौरवने स्पष्ट केलं की, त्याला कामात आलेला तोचतोचपणा नको होता. एकाच साच्यात अडकण्यापेक्षा स्वतःला पुन्हा एकदा शून्य करून नवीन लोकांसोबत काम करण्याची त्याची इच्छा होती.
advertisement
6/7
 "तिथे कलाकार वेगळे होते, त्यांची कामाची पद्धत नवी होती. मला किती येतंय, प्रत्येकाची शैली कशी आहे? कोण कसं काम करतं, हे शिकायचं होतं." असं त्याने सांगितलं.
"तिथे कलाकार वेगळे होते, त्यांची कामाची पद्धत नवी होती. मला किती येतंय, प्रत्येकाची शैली कशी आहे? कोण कसं काम करतं, हे शिकायचं होतं." असं त्याने सांगितलं.
advertisement
7/7
गौरवच्या या स्पष्टीकरणामुळे एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे की, तो केवळ प्रसिद्धीसाठी इकडून तिकडे फिरणारा कलाकार नाही. त्याला स्वतःच्या कलेमध्ये प्रयोग करायचे आहेत आणि नवीन आव्हानांना भिडायचं आहे. हास्यजत्रा सोडणं हा त्याच्यासाठी करिअरमधील एक रिफ्रेश बटण दाबण्यासारखा अनुभव होता.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement