Car Mileage : कोणत्या Speed ने कार चालवली तर मिळेल चांगला मायलेज? 99% ड्रायव्हर्सना हे माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हाला वाटत असेल की 10-20 च्या स्पीडमध्ये गाडी जास्त मायलेज देते, तर तुम्ही चुकताय. चला तर मग जाणून घेऊया, नक्की कोणत्या 'मॅजिकल स्पीड'वर तुमची कार सर्वात जास्त मायलेज देऊ शकते.
सध्याच्या काळात घराबाहेर पडलं की खिशाला कात्री लागते ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे. कार कितीही महागडी असली तरी, "गाडी एव्हरेज किती देते?" हा प्रश्न प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयासाठी आजही महत्त्वाचा आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की गाडी खूप हळू चालवली (Slow Driving) की पेट्रोल वाचतं, तर काही जणांना वाटतं की हायवेवर सुसाट गाडी पळवली की इंजिन फ्री चालतं. पण खरं पाहाता कोणती स्पीड मायलेजसाठी योग्य आहे? तुमच्या गाडीच्या स्पीडोमीटरमध्येच मायलेजचं खरं गुपित दडलेलं असतं.
advertisement
advertisement
70 ते 90 मायलेजचा 'स्वीट स्पॉट'संशोधनानुसार, बहुतेक कारसाठी सर्वात जास्त मायलेज देणारी गती ही 70 किमी प्रति तास ते 90 किमी प्रति तास या दरम्यान असते. जेव्हा तुम्ही तुमची कार टॉप गिअरमध्ये (5 व्या किंवा 6 व्या गिअरमध्ये) या स्थिर गतीने चालवता, तेव्हा इंजिन सर्वात कमी RPM वर जास्त अंतर कापते. यामुळे तुमच्या गाडीच्या सामान्य मायलेजमध्ये 15% ते 20% पर्यंत सुधारणा होऊ शकते.
advertisement
केवळ वेग महत्त्वाचा नाही, तर योग्य वेळी गिअर बदलणेही तितकेच गरजेचे आहे.अनेकजण 30 च्या स्पीडवर असतानाच 5 वा गिअर टाकतात. यामुळे इंजिनवर प्रचंड ताण (Load) पडतो आणि इंधन जास्त जळते.पण लक्षात ठेवा जसा तुमचा RPM काटा 2,000 च्या जवळ पोहोचेल, तसा मोठा गिअर टाकावा. इंजिनवर जितका कमी दबाव, तितका जास्त फायदा तुमच्या खिशाला.
advertisement
तुम्ही कधी नोटीस केलंय का? जेव्हा गाडी 90 च्या पुढे जाते, तेव्हा बाहेरच्या हवेचा विरोध (Air Resistance) वाढतो. 100-120 च्या वेगात इंजिनला हवा कापण्यासाठी खूप जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे मायलेज 25% पर्यंत कमी होऊ शकते. हायवेवर गाडी वेगात असताना खिडक्या उघड्या ठेवू नका. यामुळे गाडीमध्ये हवेचा दाब वाढतो (Drag Effect) आणि इंजिनला गाडी ओढण्यासाठी जास्त तेल लागते.
advertisement
स्मूथ ड्रायव्हिंग आणि क्रूझ कंट्रोलवारंवार एक्सलेरेटर दाबणे आणि अचानक ब्रेक मारणे हे मायलेजचे सर्वात मोठे शत्रू आहेत.जर तुमच्या कारमध्ये Cruise Control फीचर असेल, तर हायवेवर ते 80 किमी प्रति तास या वेगावर सेट करा. यामुळे इंजिनला किती इंधन पुरवायचे, याचे अचूक गणित गाडीचा कॉम्प्युटर ठरवतो. अचानक वेग वाढवण्यापेक्षा हळूहळू वेग पकडणे तुमच्या बँक बॅलन्ससाठी आणि कारच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
advertisement
99% ड्रायव्हर्स करतात 'या' चुका1. क्लचचा अतिवापर: शहरात ट्रॅफिकमध्ये अनेकजण अर्ध्या क्लचवर गाडी चालवतात, यामुळे इंधन वाया जाते.2. टायरमधील कमी हवा: टायरमध्ये हवा कमी असेल तर इंजिनवर जोर पडतो. त्यामुळे नेहमी शिफारस केलेला हवेचा दाब (Tyre Pressure) ठेवा.3. वेळेवर सर्व्हिसिंग: वेळेवर ऑइल न बदलल्यास इंजिनची कार्यक्षमता कमी होते.
advertisement









