Kitchen Tips: धान्याला कीड लागली असेल तर या टिप्स वापरा, घरगुती - नैसर्गिक उपायांनी राहिल धान्य स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कडधान्यं, डाळीमध्ये छोटे किडे होत असल्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते, धान्य वापरण्यायोग्य राहत नाही. यावर घरातलेच काही जिन्नस प्रभावी उपाय ठरु शकतात.
मुंबई : हवेतल्या बदलांमुळे धान्य खराब होतं. अशावेळी घरातलेच काही उपाय उपयोगी ठरु शकतात. हे उपाय नैसर्गिक आणि प्रभावी आहेत. कडधान्यं, डाळीमध्ये छोटे किडे होत असल्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते, धान्य वापरण्यायोग्य राहत नाही. यावर घरातलेच काही जिन्नस प्रभावी उपाय ठरु शकतात.
घरातले उपाय :
1.हिंग वापरा.
कडधान्य, डाळींचं किटकांपासून संरक्षण करण्यासाठी हिंग हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. कडधान्यं साठवताना त्यात हिंगाचा छोटा तुकडा टाकू शकता. हिंगाचा तीव्र वास किडे दूर ठेवण्यास मदत करतो. याशिवाय हिंगामुळे डाळींची चवही कायम राहते आणि कोणत्याही प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो.
advertisement
कसं वापरावं:
डाळी हवाबंद डब्यात ठेवा आणि त्यात हिंगाचा छोटा तुकडा ठेवा. हिंगाचा तुकडा डाळीच्या थेट संपर्कात येत नाही याकडे लक्ष असू दे, यासाठी कापडात गुंडाळून तो डब्यात ठेवा.
2. लवंगा वापरा.
किटकांपासून संरक्षण करण्यासाठी लवंगा देखील एक प्रभावी उपाय आहे. लवंगाची तीव्र आणि मजबूत चव किटकांना दूर ठेवते. लवंग वापरून कडधान्यं सुरक्षित ठेवता येतात. लवंग ही कडधान्यं ताजी ठेवण्याची आणि किटकांपासून दूर ठेवण्याची एक जुनी पद्धत आहे.
advertisement
Spices for blood sugar control : स्वयंपाकघरात या मसाल्यांचा वापर करा, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा
कसं वापरावं:
डाळीच्या डब्यात काही लवंगा ठेवा. यामुळे डाळींमध्ये किडे शिरणार नाहीत, डाळीची चवही चांगली येईल.
3. तुळशीची पानं -
तुळशीच्या पानांचा सुगंध देखील किटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. तुळशीच्या पानांचा वापर केल्यानं कडधान्य ताजी राहतात.
advertisement
कसं वापरावं :
डाळीत तुळशीची थोडी पानं टाका. तुम्ही ही पानं थेट डाळीच्या डब्यात ठेवू शकता किंवा सुती कापडात गुंडाळून ठेवू शकता.
इतर काही उपाय:
हवाबंद कंटेनर वापरा: कडधान्यं नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे किटकांच्या प्रवेशाला प्रतिबंध होऊ शकतो.
उन्हात वाळवणे : धान्य उन्हात वाळवणे हा देखील एक चांगला उपाय आहे. यामुळे कडधान्यांमधील आर्द्रता कमी होते, जी किटकांसाठी अनुकूल असते.
advertisement
कडधान्य स्वच्छ ठेवा: डाळी खरेदी केल्यानंतर त्या पूर्णपणे स्वच्छ करा आणि मगच डब्यात भरा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 5:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Kitchen Tips: धान्याला कीड लागली असेल तर या टिप्स वापरा, घरगुती - नैसर्गिक उपायांनी राहिल धान्य स्वच्छ