बुरहानपुर : मुलांची तब्येत खराब झाल्यावर सर्व कुटूंब काळजीत असते. मात्र, आता जर तुमच्या जर मुलाला ताप आला असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही घरीच तुमच्या मुलाला ताप बरा करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला नैसर्गिक औषध पद्धतीनुसार दोन उपाय करावे लागतील. हे उपाय केल्यावर तुमच्या मुलांचा ताप बरा होईल. नेमका उपाय काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
नेमका काय उपाय कराल -
लोकल18 च्या टीमने याबाबत खडकोद येथील नैसर्गिक आरोग्य केंद्राचे प्रभारी दीपक कपाडिया यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे 24 क्रियांद्वारे सर्वात मोठे आजारही बरे केले जातात. जर तुमच्या मुलांनाही वारंवार ताप येत असेल तर तुम्ही घरी बसून ताप बरा करू शकता. यामध्ये तुम्हाला निसर्गोपचार पद्धतीचे दोन उपक्रम वापरायचे आहेत.
यामध्ये सर्वात आधी तुम्हाला ओल्या कापडाची पट्टी 5 ते 6 वेळा मुलाच्या डोक्यावर ठेवावी लागेल. यामुळे ताप थांबेल. मात्र, तरीही ताप येत असेल तर तुमच्या मुलाच्या घोंगडी अंगाभोवती 5 ते 6 वेळा ओले करुन गुंडाळावी. त्यामुळे तापाची समस्या दूर होईल. असे दोन ते तीन दिवस तुम्हाला करावे लागेल. असे तुम्ही केले तर तुमच्या मुलांना ताप येणार नाही.
आतापासून 200 वर्षांपूर्वी आपले पूर्वजही आपल्या मुलांना ताप येत असल्याने ही उपाय याच पद्धतीचा अवलंब करायचा. यामुळे त्यांची तापाची समस्या दूर होईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची औषधी, गोळी खावी लागणार नाही.
सूचना : या बाबतीत दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. व्यक्तिगत सल्ला नाही. कोणतीही उपचार पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
