TRENDING:

झोप येत नाहीये, अजिबात हलक्यात घेऊ नका ही लक्षणं, नेमकं काय कराल?, कामाची माहिती..

Last Updated:

sleeping tips in marathi - निरोगी आणि उत्साही आयुष्यासाठी वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच 6-8 तासांची पुरेशी झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनंत कुमार, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

गुमला - सध्या प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे झाल्याचे दिसून येते. या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना चांगली आणि आरामदायी झोप येत नाही. चांगली झोप न झाल्याने त्याचे मानसिक आणि शारिरीक परिणाम होऊ शकतात. जे लोक नियमितपणे आरामदायी झोपेचा आनंद घेतात, ते सकाळी लवकर ताजेतवाने होऊन उठतात. यामुळे त्यांच्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे तुम्हालाही जर नीट झोप येत नसेल, तुम्ही निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

advertisement

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. पंकज कुमार यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, “निरोगी आणि उत्साही आयुष्यासाठी वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच 6-8 तासांची पुरेशी झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते," असे ते म्हणाले. त्यामुळे तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहील आणि तुमची उर्जावान राहाल, यासाठी नेमकं काय करावं, हे जाणून घेऊयात.

advertisement

1. चांगल्या झोपेसाठी दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे -

चांगल्या आणि गाढ झोपेसाठी सर्वात आधी दिनचर्या आणि आहार संतुलित हवा. नियरिप रुपाने व्यायाम करणे आणि आरोग्यदायी आहार घेतल्याने झोपेची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते. रात्री जेवणानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर कमीत कमी दीड दे दोन तासांनी झोपल्याने पचन सुरळीत राहते, ज्यामुळे झोप चांगली होते.

advertisement

रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असावे. यामुळे पोटावर जास्त दाब पडत नाही आणि पचनक्रिया सुरळीत राहते. आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. म्हशीचे दूध झोपेसाठी उपयुक्त मानले जाते. झोपण्यापूर्वी म्हशीचे दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता वाढू शकते.

2. झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा

लोकांच्या झोपेवर आजकाल, सर्वात मोठा नकारात्मक परिणाम हा त्यांच्या झोपेच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर केल्याने होतो. ही सर्व उपकरणे झोपेत अडथळा निर्माण करतात. कारण यातून निघणारी ब्लू लाइट मेंदूला सक्रिय ठेवते आणि झोपेत अडथळा निर्माण होतो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा तुमच्यावर परिणाम होऊ नये यासाठी झोपताना मोबाइल तुमच्या शरीरापासून किमान 4 ते 5 फूट दूर ठेवावा. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी वारंवार मोबाईल पाहण्याची सवय असेल तर तो खोलीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि चांगली झोप येण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

advertisement

3. नियमितपणे व्यायाम आणि प्राणायाम करावा -

चांगली झोप येण्यासाठी दररोज व्यायाम आणि प्राणायाम करण्याचा फायदा होतो. योग, ध्यान आणि प्राणायाम केल्याने मानसिक शांती मिळते. झोपेत सुधारणा होते. दिवसात 10 ते 15 ध्यान किंवा श्वसनाचा व्यायाम केल्याने तणाव कमी केला जाऊ शकतो. झोपण्यापूर्वी कमीत कमी 100 पाऊले चालल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि झोपेत सुधारणा होते.

4. तणावमुक्त राहा आणि मानसिक शांततेची काळजी घ्यावी -

चांगल्या झोपेसाठी मानसिक शांती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तणावात असाल तर तुमच्या झोपेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती जसे की अश्वगंधा किंवा सर्पगंधा वापरू शकता. तणावमुक्त राहण्यासाठी, दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि आवश्यक विश्रांती घेत रहावी. यामुळे मानसिक एकाग्रताही सुधारते. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अश्वगंधा किंवा सर्पगंधा यांचे सेवन करा.

5. गरजेपेक्षा जास्त झोपू नका -

झोप गरजेची आहे. मात्र, गरजेपेक्षा जास्त झोपणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक झोपेमुळे शरीरात आळस तयार होतो. यामुळे दिवसभराची कामांना उशीर होतो. जास्त झोपल्याने लठ्ठपणा, शारीरिक जडपणा आणि इतर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. केवळ मानसिक आरोग्यासाठीच नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही संतुलित झोप आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

सूचना - या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या बातमीतील मतांशी लोकल18 मराठी सहमत नसून जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
झोप येत नाहीये, अजिबात हलक्यात घेऊ नका ही लक्षणं, नेमकं काय कराल?, कामाची माहिती..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल