शाहजहांपुर : खेळाडूंची फिटनेस पाहून प्रत्येक जण त्यांच्याकडे आकर्षित होतो. प्रत्येकाला वाटते आपलीही अशीच फिटनेस असावी. त्यामुळे मग खेळाडू कसे राहतात, कोणती फळे खातात याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. त्यामुळे आज आपण एका फळाबाबत जाणून घेऊयात, जे फळ खेळाडूंची पहिली पसंत असल्याचे मानले जाते. तुमच्याही मनात आता तो प्रश्न असेल की ते फळ म्हणजे नेमकं कोणतं, तर ते फळ म्हणजे केळी.
advertisement
केळी हे सुपरफूड मानले जाते. त्यामुळे एक्सपर्ट्स बहुतेक लोकांना दररोज किमान एक ते दोन केळी खाण्याचा सल्ला देतात. केळ्याचे असंख्य फायदे आहेत. या फळामुळे अनेक आजारांपासून आराम मिळतो. केळी हे एक फळ आहे जे युगांडामध्ये खूप पसंत केले जाते. हृदयविकारांपासून आराम देण्यासोबतच केळी चेहऱ्यावर चमकही आणते. यासोबतच केसांसाठीही केळी फायदेशीर मानली जाते.
कृषी विज्ञान केंद्र नियामतपुर येथील शास्त्रज्ञ डॉ. विद्या गुप्ता यांनी लोकल18 ला याबाबत माहिती दिली. यावेळी लोकल18 शी बोलताना त्या म्हणाल्या की, केळीत लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, बी आणि बी 6 यांसारखे अनेक पोषक घटक त्यात आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनोइड्स देखील यामध्ये आढळतात.
पिकलेल्या केळीत पोटॅशियम और मॅग्नेशियम आढळते. या कारणामुळे हे फळ उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासोबतच केळीमध्ये निरोगी बॅक्टेरिया आढळतात जे आतडे निरोगी ठेवतात आणि पचनशक्ती मजबूत करतात, असे त्यांनी सांगितले.
मानसिक तणाव असेल तर केळी खा -
डॉ. विद्या गुप्ता यांनी सांगितले की, केळ्यामध्ये आढळणाऱ्या ट्रिप्टोफॅनमुळे ते नैराश्य आणि मानसिक तणाव दूर करते. पिकलेली केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्नायू मजबूत होतात. केळीमध्ये आढळणाऱ्या ऊर्जेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे बहुतांश खेळाडू केळी खातात.
hanuman chalisa : हनुमान चालिसा कधी वाचायला हवी? तुम्हाला ‘या’ सर्व गोष्टी माहिती नसतील..
अॅनिमियाला करतो दूर -
डॉ. विद्या गुप्ता यांनी सांगितले की, केळीमध्ये आढळणारे फायबर, कॅल्शियम आणि लोह शरीरातील अशक्तपणा दूर करते. महिलांमध्ये ॲनिमियापासून आराम मिळतो. याशिवाय यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनोइड्समुळे डोळेही आरोग्यदायी राहतात.
डॉ. विद्या गुप्ता यांनी सांगितले की, पिकलेल्या केळ्याचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठीही करता येतो. पिकलेल्या केळ्याचा फेस पॅक, डेकोक्शन आणि फेस मास्क बनवून त्वचा सुधारली जाऊ शकते. यासोबतच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही केळी कस्टर्ड, मफिन, केक, पॅन केक, जॅम, जेली, आइस्क्रीम आणि शेक तयार करून खाऊ शकता. आरोग्यदायी व्यक्तीने दररोज एक ते दोन केळी खावीत. मात्र, रिकाम्या पोटी केळीचे सेवन करू नये, असेही त्या म्हणाल्या.
Disclaimer : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी लोकल18 जबाबदार नसेल.