मुंबई: उन्हाळ्यात उकाड्यानं घामाघूम झाल्यावर थंड काहीतरी पिण्याची इच्छा होतेच. तेव्हा अनेकजण कोकम सरबत पिण्याला प्राधान्य देतात. कोकम सरबत किंवा कोकम आगळ उन्हाळ्यात सर्वांच्या घरी हमखास असतं. कोकणात पिकणाऱ्या कोकमचे फळ मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या कोकम सरबताचे नेमके कोणते फायदे आहेत? मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
उन्हाळ्यता कोकम सरबत पिण्याचे फायदे
उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोकम सरबत शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. त्यासोबतच कोकम हे वात, पित्त नाशक फळ आहे. कोकम सरबत प्यायल्याने ऍसिडिटी होण्याचे प्रमाण कमी होते. कोकममध्ये एन्झाईम इलॅस्टिज असतो. त्यामुळे आपली त्वचा हेल्दी राहते. त्वचेवर असणारे रिंकल्स दूर होतात. त्यासोबतच कोकम सरबतमध्ये पॉलिफिनॉल्स असतात. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते, असेही भगत सांगतात.
पोटात Caffeine जाणं चांगलं की वाईट? Coffee पिणाऱ्यांना माहित असायलाच हवं!
कॅन्सराचा टळेल धोका
कोकम सरबतमध्ये गार्सीनोल एन्झाईम असतो. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका टळतो. जर कॅन्सर होणार असेल तर गार्सीनोल एन्झाईममुळे त्या कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. कोकममुळे शरीरातील सेरेटोनील हार्मोन अधिक प्रमाणात रिलीज होतात. जेणेकरून चिंता, तणाव इत्यादींचे त्रास देखील कमी होण्यास मदत होते, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
म्युझिक थेरपीनं रुग्णांवर उपचार करतो शिक्षक, 17 वर्षांपासून देतोय विनामूल्य सेवा PHOTOS
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत
कोकमच्या थंड गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात कोकम सरबताला प्राधान्य दिलं जातं. कोकम सरबतमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, अशी माहिती आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.