Coffee दररोज पित असाल, तर तुम्हाला हे माहित असायलाच हवं! Experts सागतात...

Last Updated:

आपण दररोज पितो ती कॉफी चांगली की वाईट? तिचे शरिरावर नेमके काय परिणाम होतात? छत्रपती संभाजीनगर शहरातील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक याबाबत काय सांगतात, जाणून घेऊया. 

+
कॉफी

कॉफी प्यायल्यावर शरीर, मन ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. पण...

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : 'सकाळचा चहा' हा जगभरातल्या कोट्यवधी लोकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण त्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. तर अनेकजणांना कॉफी पिण्याची सवय असते. बरं हे दोन पेय आपण फक्त सकाळी पितो असं नाहीये, तर दिवसभरात जेव्हा कधी थकवा येतो किंवा तल्लफ येते तेव्हा तेव्हा आपण आपल्या मूडनुसार चहा किंवा कॉफी पितो. कॉफीमध्ये 'कॅफेन' (Caffeine) नावाचा घटक असतो ज्यामुळे तिच्या एका घोटात शरीर ऊर्जावान झाल्यासारखं वाटतं, आळस अगदी दूर पळून जातो. मग शरीर जणू घोड्याच्या वेगानं पळू लागतं. परंतु हे कॅफेन जास्त प्रमाणात  घेऊ नये, नाहीतर शरिरावर वाईट परिणाम होतात असंही तज्ज्ञ सांगतात, मग आपण दररोज पितो ती कॉफी चांगली की वाईट? तिचे शरिरावर नेमके काय परिणाम होतात? छत्रपती संभाजीनगर शहरातील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक याबाबत काय सांगतात, जाणून घेऊया.
advertisement
आजकाल जवळपास प्रत्येकाची जीवनशैली धावपळीची असते, त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात का असेना पण ताण सर्वांनाच असतो. परंतु ज्यांची जीवनशैली अति ताणाची असेल, अशा सर्व व्यक्तींनी सकाळी नाश्ता झाल्यानंतर कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही, त्यामुळे त्यांचा ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. परंतु कॉफी प्रमाणात घ्यावी, म्हणजे अर्धाच कप. कारण चहा आणि कॉफी हे उत्तेजक पदार्थ असल्यामुळे त्यांचं सेवन हे कमी प्रमाणातच असायला हवं.
advertisement
कॉफी प्यायल्यावर शरीर, मन ताजंतवानं झाल्यासारखं निश्चितच वाटतं. शिवाय आपल्या रक्तवाहिन्यांना चिकटलेली जी चरबी असते तीसुद्धा कॅफेनमुळे बाहेर पडण्यास मदत मिळते. परंतु जेव्हा कॉफी घ्यायची असेल, तेव्हा आधी काहीतरी खावं. रिकाम्यापोटी कधीच कॉफी पिऊ नये. कॅफेनमुळे अन्नपचनही व्यवस्थित होतं.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा लठ्ठपणाचा त्रास असेल त्यांनी कॉफी पिण्यापूर्वी त्यातून जेवढ्या कॅलरीज शरिरात जाणार आहेत तेवढ्या कमी करण्याचीही तयारी ठेवावी. अतिप्रमाणात किंवा मनाला वाटेल तेव्हा कॉफी घेऊ नये, कारण कॅफेनचे जसे चांगले परिणाम आहेत, तसेच वाईटही परिणाम आहेत, हे कायम लक्षात ठेवावं. शिवाय कोणत्याही पदार्थाचे फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा तो योग्य प्रमाणात शरिरात जातो, असं अलका कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coffee दररोज पित असाल, तर तुम्हाला हे माहित असायलाच हवं! Experts सागतात...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement