5 मिनिटांत पाहुणा खूश, कोल्ड्रिंकपेक्षाही भारी सरबत बनवण्याची सोपी पद्धत, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:News18 Marathi
Last Updated:
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिणं अनेकांना आवडत नाही. तेव्हा घरातच अगदी 5 मिनिटांत बनणारा आरोग्यदायी कैरीचा सरबत किंवा कैरीचे पन्हे हा एक उत्तम पर्याय आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात घरी कुणी आलं की कोल्ड्रिंक, सरबत किंवा कोकम पिण्यासाठी दिलं जातं. तसेच बाहेर गेल्यावरही थंडगार रस किंवा कोल्ड्रिंक पिण्यास प्राधान्य दिलं जातं. पण कोल्ड्रिंक पिणं अनेकांना आवडत नाही. तेव्हा घरातच अगदी 5 मिनिटांत बनणारा आरोग्यदायी कैरीचा सरबत किंवा कैरीचे पन्हे हा एक उत्तम पर्याय आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मेघना देशपांडे यांनी अगदी झटपट बनणारी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
कैरीच्या सरबतासाठी साहित्य
उकडलेल्या कैरीचा गर, पिकलेल्या आंब्याच्या फोडी, थोडी साखर, भिजवलेले सब्जा बी, वाळलेली पुदिन्याची पाने, चाट मसाला, काळे मीठ, मिरचीचे काप आणि आलं हे साहित्य लागेल.
कसा बनवायचा कैरीचा सरबत?
कैरीचा सरबत तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेल्या कैरीचा गर घालायचा. त्यानंतर पिकलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची. चाट मसाला, आलं आणि मिरचीचे काप टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये वाळलेली पुदिन्याची पाने टाकायची. ताजा पुदिना देखील यामध्ये टाकू शकता. सगळ्यात शेवटी चवीनुसार काळे मीठ टाकायचे. हे सर्व साहित्य मिक्सरमधून चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं.
advertisement
सर्व साहित्य एकदा बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं. गरजेनुसार पाणी घालावं. पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं. अशा पद्धतीने हे चटपटीत कैरीचं सरबत तयार होतं. त्यात थोडे बर्फाचे तुकडे टाकले की थंडगार कैरीचं सरबत पिऊ शकता. उन्हाळ्यात पाहुणे घरी आल्यास अगदी 5 मिनिटांत तयार होणारी आरोग्यदाी रेसिपी बनवू शकता, असे देशपांडे सांगतात.
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
Apr 09, 2024 3:21 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
5 मिनिटांत पाहुणा खूश, कोल्ड्रिंकपेक्षाही भारी सरबत बनवण्याची सोपी पद्धत, Video










