उन्हाळ्यात बनवा चटपटीत काकडी चाट, अगदी 5 मिनिटांत रेसिपी तयार, Video

Last Updated:

उन्हाळ्यात चटपटीत आणि थंडगार खायचं असेल तर काकडी चाट चांगला पर्याय आहे. सोपी रेसिपी इथं पाहा.

+
उन्हाळ्यात

उन्हाळ्यात बनवा काकडीचे थंडगार चाट, पाहा अगदी 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी, Video

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: उन्हाळ्यात पाण्याची तहान आणि गारेगार खाण्याची हौस भागवणारे अनेक पौष्टिक आणि चांगले पदार्थ आपल्याकडे आहेत. त्यातील एक म्हणजे हिरवी काकडी. बरेच जण विशेषतः लहान मुलं काकडी खाण्यास टाळतात. मात्र काकडीची चाट बनवून दिली तर सर्वजण आवडीने खातील. या थंडगार आणि उष्णता कमी करणाऱ्या काकडीची चाट रेसिपी अगदी साधी सोपी आहे. याबाबत वर्धा येथील श्रद्धा जगताप यांनी माहिती दिलीय.
advertisement
काकडी चाटसाठी साहित्य
साल काढून घेतलेल्या दोन हिरव्या काकड्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो ,बारीक चिरलेली थोडीशी कैरी, तिखट, मीठ, चाट मसाला, ऑरगॅनो, जिरे पावडर, बारीक शेव आणि कोथिंबीर. या साहित्यात चटपटीत चाट तयार करता येते.
काकडीची चाट रेसिपी
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून तसेच साल काढून घ्यावी. त्यानंतर काकडीचे मधून दोन उभे भाग करावे. आता काकडीच्या आतील बियांचा गर हलक्या हाताने खरवडून चमच्याने काढून घ्यायचा आहे. आता एका बाऊलमध्ये काकडीचा काढलेला गर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार तिखट, मीठ, चाट मसाला, ऑरीगॅनो, जिरे पावडर घालून कुसकरून एकत्र करून घ्यायचे. आता हे मिश्रण आपण पोकळ केलेल्या काकडीमध्ये घालायचे आहे, म्हणजेच भरायचे आहे. त्यावर शेव आणि कोथिंबीर घालून थंडगार काकडी सर्व्ह करायची आहे.
advertisement
अगदी 5 मिनिटांत ही काकडी चाट तयार होते. तसेच उन्हाळ्यात आरोग्यासाठी हितकारकही आहे. त्यामुळे घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही चटपटीत काकडी चाट रेसिपी आपणही नक्की ट्राय करू शकता.
मराठी बातम्या/रेसिपी/
उन्हाळ्यात बनवा चटपटीत काकडी चाट, अगदी 5 मिनिटांत रेसिपी तयार, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement