advertisement

CRIME : रेल्वे स्टेशनसमोरच दिवसाढवळ्या आदित्यला खंजिराने भोसकलं, अंगावर काटा आणणारा Video, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

Last Updated:

Hingoli Crime News : आदित्य सूर्यवंशी हा रेल्वे स्टेशन परिसरात असताना अचानक तीन तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर खंजिराने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

Hingoli Crime, Railway Station Murder
Hingoli Crime, Railway Station Murder
Railway Station Murder Case : महाराष्ट्रात एकीकडे गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता हिंगोली शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये भरदिवसा एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आदित्य सूर्यवंशी असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर तिघांनी मिळून अमानुषपणे वार केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.

खंजिराने सपासप वार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना जुन्या वादातून आणि आपसातील कुरबुरीतून घडली असल्याचे समोर आले आहे. आदित्य सूर्यवंशी हा रेल्वे स्टेशन परिसरात असताना अचानक तीन तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर खंजिराने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, हल्लेखोरांनी धारदार खंजिराने आदित्यच्या पोटात वार केले. त्यातील एका आरोपीने तर क्रूरतेची सीमा ओलांडत जखमी आदित्यला मोठ्या दगडाने देखील बेदम मारहाण केली आहे.
advertisement

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सदर संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरदिवसा आणि लोकांची वर्दळ असताना आरोपींनी कोणत्याही भीतीविना हे कृत्य केले. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, तो पाहून कोणाचेही काळीज थरारेल असा आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून ये-जा करणारे नागरिक या प्रकारामुळे हादरून गेले होते. दिवसाढवळ्या अशा प्रकारे शस्त्रे नाचवत हल्ला झाल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
advertisement

तिन्ही आरोपी पसार

हिंगोली पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत त्वरित तपासचक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी प्रथम कुऱ्हे, विकास खंदारे आणि अरबाज नावाच्या तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर हे तिन्ही आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जखमी आदित्य सूर्यवंशी याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement

लवकरात लवकर अटक करण्याची मागणी

पोलीस प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. भरवस्तीत झालेला हा खंजिराचा हल्ला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलीस कधीपर्यंत बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
CRIME : रेल्वे स्टेशनसमोरच दिवसाढवळ्या आदित्यला खंजिराने भोसकलं, अंगावर काटा आणणारा Video, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement