विदर्भातील प्रसिद्ध कणकेचे धापोडे बनवतात कसे? पाहा सोपी रेसिपी, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
उन्हाळ्याची सुरुवात झाली की विदर्भात गृहिणींची धापोडे बनविण्याची लगबग सुरू होते. ज्वारीचे, बाजरीचे, नाचणीचे धापोडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा बनवले जातात.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: उन्हाळ्याची सुरुवात झाली की विदर्भात गृहिणींची धापोडे बनविण्याची लगबग सुरू होते. ज्वारीचे, बाजरीचे, नाचणीचे धापोडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा बनवले जातात. त्यातीलच एक प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे गव्हाच्या कणकेचे धापोडे. गव्हाचे धापोडे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. तसेच ही रेसिपीही अगदी सोपी आहे. वर्धा येथील गृहिणी अरुणा घोंगडे यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
advertisement
धापोडो बनवण्याचे साहित्य
एक ग्लास कणिक, एक वाटी तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट, ओवा आणि तीळ हे साहित्य लागेल. कणिक रात्री भिजवून ठेवली तर सकाळी छान आंबूस येते. त्यामुळे धापोड्यांची चव आणखीनच छान लागते. शक्यतो कणिक रात्री भिजवून सकाळीच धापोडे करायला घ्यावे.
advertisement
धापोडे कसे बनवायचे?
सर्वप्रथम एका खोल भांड्यात पाणी घेऊन त्यात कणिक आणि तांदळाचे पीठ अॅड करायचं आहे. (तांदळाचे पीठ हे नाही वापरलं तरीही चालेल.) आता त्यात आले लसूण पेस्ट तिखट, मीठ, ओवा आणि तीळ अॅड करायचं. पाण्याच्या साह्याने साध्या पाण्याने पातळ भिजवून एकत्र करून घ्यायचं. एकत्र करताना त्यात कुठल्याही गुठळ्या राहू नये याची काळजी घ्यावी.
advertisement
गॅसवर गरम पाणी ठेवून ते पाणी उकळल्यावर त्यात भिजवलेली पातळ कणिक अॅड करायची आहे. एका हाताने ढवळत ढवळत कणिक गरम पाण्यात अॅड करायची. आता हे मिश्रण घट्ट येईपर्यंत शिजू द्यायचे. जवळजवळ 20 ते 30 मिनिट याला शिजायला लागतील. हे मिश्रण चांगलं शिजवून घेणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा धापोडे काढताना तुकडे पडतील. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारचे हे मिश्रण शिजवून घ्यायचं.
advertisement
आता मिश्रण छान शिजल्यानंतर गरमागरम मिश्रण ओल्या कापडावर उन्हात टाकायचे आहेत. दिवसभर छान वाळल्यानंतर सायंकाळी धापोड्यांच्या मागील बाजूस कापडाला पाणी टाकून ओले करावे आणि हे धापोडे काढून घ्यावे. विदर्भात हे ओले धापोडे खाणं सगळेजण पसंत करतात. घरोघरी ओले धापोडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जातात. त्यानंतर कडकडीत उन्हात वाळवून डब्यात वर्षभरासाठी साठवून ठेवले जातात. हे धापोडे भाजून किंवा तळूनही खूपच टेस्टी लागतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
March 28, 2024 10:29 PM IST