Dhurandhar Movie: हजार कोटींचा टप्पा गाठलेल्या 'धुरंदर'ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एन्ट्री, कोणत्या गोष्टीमध्ये केला पराक्रम?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर' चित्रपटाने 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' केला आहे. चित्रपटातल्या ज्या गाण्यावर अख्खं जग थिरकलंय त्या गाण्याने रेकॉर्ड बनवला आहे.
एक हजार कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणाऱ्या 'धुरंदर' चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर' चित्रपटाने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. चित्रपटातील ज्या गाण्यावर अख्खं जग थिरकलंय त्या गाण्याने रेकॉर्ड बनवला आहे. अक्षय खन्नाच्या एन्ट्रीवर वाजणाऱ्या फासला (Fa9la) गाणं अजूनही सोशल मीडियावर चांगलंच वाजतंय. हे गाणं सर्वाधिक बिलबोर्डसह अरबी चार्टमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर 'धुरंदर' चित्रपट ओटीटीवर सध्या हवा करत आहे. आता त्यानंतर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
भारतासह अख्ख्या जगात अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' चित्रपटाने 1300 कोटींची कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये 'धुरंदर'ने आपले स्थान पक्कं केलं आहे. बहरीनच्या रॅपर फ्लिपेराचीने अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान मिळवले आहे. कारण चित्रपटामध्ये अक्षय खन्नाच्या एन्ट्री साँगने म्हणजेच फासला (Fa9la) हे गाणं सर्वाधिक बिलबोर्डसह अरबी चार्टमध्ये अव्वल स्थानावर आले आहे. गाणं संपूर्ण जगभर व्हायरल झाले असून अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपचे सर्वच खूप मोठे फॅन असल्याचे पाहायला मिळाले. मार्च 2026 मध्ये, 'धुरंदर'चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या शुटिंग दरम्यानच निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना ही फार मोठी गुड न्यूज मिळाली.
advertisement
गाण्याच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना फ्लिपेराची म्हणाला की, "फार मस्त वाटतय. मी पहिल्यांदाच हे गाणं गायलंय आणि ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय, ते पाहून मला फार आश्चर्य वाटतंय. आम्हाला अचानक या गाण्याबद्दल सांगितलं होतं, त्यांना हे गाणं त्यांना तात्काळ हवं होतं. त्या सीनप्रमाणेच गाणंही अगदी परफेक्ट बसल्यामुळे सर्वांनाच गाणं फार आवडलंय. त्यांनी अक्षय खन्नासाठीच हे गाणं वापरलंय. त्याने डान्स केला आणि गाणं खूप व्हायरल झालं.." फ्लिपार्ची पुढे म्हणाला की, इतर भाषांमध्ये गाण्याने कमाल कामगिरी केली आहे. दुसरी भाषा आणि संस्कृती असूनही त्या गाण्याने संपूर्ण जगभरात लोकप्रिय झाले.
advertisement
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गाण्याचा समावेश कसा झाला?
धुरंधर चित्रपटातील फासला (Fa9la) हे गाणे सर्वाधिक बिलबोर्डसह अरबी चार्टमध्ये अव्वल स्थानावर कायम राहिल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आदित्य धर यांच्या धुरंधर चित्रपटात समाविष्ट केल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि रॅपर फ्लिपेराचीचे नाव देखील चर्चेचा विषय बनला. त्याची लोकप्रियता, विशेषतः भारतात, एका रात्रीत वाढली आणि आता, त्याच्या यशानंतर, रॅपर मार्च 2026 मध्ये भारत दौऱ्याची तयारी करत आहे .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 3:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar Movie: हजार कोटींचा टप्पा गाठलेल्या 'धुरंदर'ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एन्ट्री, कोणत्या गोष्टीमध्ये केला पराक्रम?








