Mumbai News : गांजा तस्कराला भाजप आमदाराने भररस्त्यात चोपला, बोरिवलीतील घटना
Last Updated:
Borivali Crime News : बोरिवलीमधून गांजा तस्करी संबंधित एक बातमी समोर आलेली आहे. जिथे नेमकं पुढे काय घडते आणि कशा प्रकारे घडलं आहे ते जाणून घ्या.
मुंबई : बोरिवली परिसरात गांजा तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केला आहे. बोरिवलीतील एका ठिकाणी सुरू असलेल्या कथित गांजा विक्रीची माहिती मिळाल्यानंतर संजय उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी एका संशयित गांजा तस्कराला जाब विचारला. वाद वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीला आमदारांनी चोप दिल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
संजय उपाध्याय यांचा तस्करावर संताप
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. बोरिवलीत खुलेआम अंमली पदार्थांची विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संजय उपाध्याय यांनी केला आहे. तरुण पिढी गांजाच्या विळख्यात अडकत असून हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई गरजेची आहे,असे ते म्हणाले.
गांजा तस्करीचा मुद्दा ऐरणीवर
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कायदा हातात घेणे योग्य नसले तरी गांजा तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे. या घटनेमुळे बोरिवलीतील अंमली पदार्थ तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 2:39 PM IST










