February Horoscope: फेब्रुवारीपासून गाडी रुळावर! लॉसमध्ये चाललेल्या 5 राशी पुन्हा फायद्यात, भाग्याचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
February Horoscope: महिन्याच्या सुरुवातीला दिनांक 06 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचा हा प्रवेश होताच मिथुन राशीत असलेल्या गुरुसोबत शुक्राचा नवपंचम योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि गुरू हे दोन्ही अत्यंत शुभ ग्रह मानले जातात. कुंडलीतील पाचवे स्थान ज्ञान आणि प्रेमाचे आहे, तर नववे स्थान भाग्य आणि धर्माचे कारक आहे. या दोन्ही ग्रहांच्या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात भाग्योदयाचे संकेत मिळत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र-गुरुचा नवपंचम योग अत्यंत यशदायक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ मोठा लाभ घेऊन येईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. या काळात केलेले प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








