advertisement

53,50,00,00,00,000! सरकार खर्चात नंबर वन; तुम्हाला काय मिळाले? खर्चिक बजेटचा भुलभुलैय्या सोप्या शब्दात, Infographics

Last Updated:

Budget 2026: अर्थसंकल्प 2026 मध्ये सरकारने 53.5 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी खर्चाची घोषणा केली असली, तरी सामान्य नागरिकांना थेट दिलासा देणाऱ्या घोषणा कमी असल्याची भावना आहे. मग इतका मोठा खर्च नेमका कुठे होणार आणि सामान्य माणसाला यातून काय मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

News18
News18
यंदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील वर्षांच्या तुलनेत कमी वेळाचे बजेट भाषण केले. या अर्थसंकल्पात आयकर, पेन्शन किंवा मध्यमवर्गासाठी नव्या योजनांबाबत कोणतीही मोठी किंवा ठळक घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना आणि मध्यमवर्गीयांना हे बजेट पाहून “आपल्यासाठी काहीच मिळालं नाही” अशी भावना निर्माण होणं साहजिक आहे.
मात्र, प्रत्यक्ष आकडेवारीकडे पाहिल्यास यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वाधिक खर्चिक बजेट ठरतो. केंद्र सरकारने बजेट 2026 साठी तब्बल 53.5 लाख कोटी रुपयांच्या खर्चाची घोषणा केली आहे, जो आजवरचा उच्चांक आहे. हा आकडा ऐतिहासिक मानला जात असून, सरकारच्या खर्चाच्या क्षमतेत मोठी वाढ झाल्याचे यातून स्पष्ट होते.
गेल्या वर्षी म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये सुमारे 50 लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज मांडण्यात आला होता. त्यानंतर काही आर्थिक समायोजन करत हा खर्चाचा अंदाज सुधारित करून 49.6 लाख कोटी रुपये करण्यात आला होता.
advertisement
मात्र 2026–27 साठी सादर करण्यात आलेल्या नव्या अर्थसंकल्पात एकूण खर्चाचा अंदाज थेट 53.5 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला आहे. हा खर्च मागील वर्षीच्या बजेटपेक्षा सुमारे 4 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे.
यावरून स्पष्ट होते की, जरी सामान्य नागरिकांना थेट फायदा होईल अशा घोषणा कमी असल्या, तरी सरकारचा भर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, संरक्षण, सामाजिक योजना, आरोग्य, शिक्षण आणि दीर्घकालीन आर्थिक विकासावर खर्च वाढवण्यावर आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
53,50,00,00,00,000! सरकार खर्चात नंबर वन; तुम्हाला काय मिळाले? खर्चिक बजेटचा भुलभुलैय्या सोप्या शब्दात, Infographics
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement